दुसर्‍या दिवशीही पावसाचा व्यत्यय

0
लंडन । इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू झाला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर भारत प्रथम फलंदाजी करत आहे. मात्र पहिल्या षटकातच भारताला पहिला धक्का बसला. जेम्स अँडसरसने मुरली विजय याला बाद केले.

दुसर्‍या दिवशी इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लॉर्ड्सच्या मैदानावर कालपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार होता. मात्र पावसाच्या सततच्या अडथळ्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. आज सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या डावात मुरली विजय आणि लोकेश राहुल दोघेही सलामीवीर झटपट बाद झाले. दोनही बळी अँडरसननेच टिपले.

मात्र त्यानंतर पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला होता आणि वेळेआधीच लंच ब्रेक घेण्यात आला होता. त्यानंतर खेळाला पुन्हा सुरूवात झाली आहे. केवळ 2 षटकांचा खेळ झाला. त्यातच चेतेश्वर पुजारा धावचीत झाला आणि पावसामुळे पुन्हा खेळ थांबवण्यात आला. अखेर चहापानानंतर आता पुन्हा सामन्याला सुरूवात झाली आहे.

कालही सामना सुरू होण्यास विलंब झाला असल्याने पहिल्या दिवशी नाणेफेकीआधीच खेळाडूंना लंच ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर चहापानाची विश्रांतीदेखील घेण्यात आली होती. अखेर काल स्थानिक वेळेनुसार 4 वाजून 45 मिनिटांनी पहिल्या दिवसाचा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती आयसीसीनेे दिली होती.इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर मुरली विजयचा अडसर दूर केला. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडरसनने विजयला क्लीन बोल्ड केले आणि भारताला पहिला धक्का बसला. विजयला यावेळी भोपळाही फोडता आला नव्हता. यावेळी भारताची अवस्था 1 बाद 0 अशी होती.

दोन चौकारानंतर लोकेशही तंबूत – पहिल्या षटकात भारताला धक्का बसला होता. पण त्यानंतर सलामीवीर लोकेश राहुलने दोन चौकार लगावत चांगली सुरुवात केली होती. पण राहुलला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. अँडरसननेच राहुलला बाद करत दुसरा धक्का दिला. त्यावेळी भारताची 2 बाद 10 अशी अवस्था होती.

कोहली-रहाणे जोडी मैदानात
दुसर्‍या दिवशीही पावसाच्या जोरदार बॅटिंगनंतर अखेर पावसाने विश्रम घेतला आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे हि जोडी मैदानात आहे

LEAVE A REPLY

*