Type to search

राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी शिवम पाटील व सरला साठे यांची निवड

क्रीडा जळगाव

राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी शिवम पाटील व सरला साठे यांची निवड

Share
जळगाव । वि. प्र.- फेडरेशन ऑफ इंडिया योगा अलायन्स व योगा अलायन्स महाराष्ट्र , यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन दि. 23 जून दरम्यान नाशिक येथे करण्यात आले असून या स्पर्धेसाठी शिवम पाटील व सरला साठे यांची निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात येथील शिवम पाटील व सरला साठे यांची नाशिक येथे नुकत्याच झालेल्या राज्य स्पर्धेतून निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा डॉ. प्रताप जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रविण पाटील, सचिव अक्षय सोनवणे, यांची उपस्थिती होती. निवड झालेल्या खेळाडूंचे सतीश देशमुख, दिपक परदेशी डॉ. रितेश पाटील यांनी कौतुक केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!