Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

पाचोरा तालुक्यातील पती-पत्नीवर बिबट्याचा हल्ला

Share

सोयगाव। शेतात निंदनीचे काम करणार्‍या पती-पत्नीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने रविवारी सायंकाळी 4 वाजता हल्ला चढवला. भारत चव्हाण यांच्या पत्नी मनीषा यांना बिबट्याने कवेत घेतले. भारत यांनी बिबट्याशी तासभर संघर्ष करून पत्नीला सोडविताच बिबट्याने डाव मारून पुन्हा भारत यांना जबड्यात धरले. सोयगाव तालुक्यातील कवली शिवारात ही घटना घडली.

कवली शिवारात भारत हरिचंद चव्हाण (वय 30) आणि मनीषा भारत चव्हाण (वय 23) दोघे (रा.वरसाडा, ता.पाचोरा) हे शेतात खुरपणीचे काम करत असताना शेताच्या बांधावर गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मनीषा चव्हाण यांच्यावर हल्ला केला. मागून खुरपणी करत येत असलेल्या भारत चव्हाण यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी बिबट्याशी तासभर संघर्ष करून पत्नीची सुटका केली. परंतु चवताळलेल्या बिबट्याने पुन्हा भारत यांना जबड्यात धरले. तेव्हा मनीषा यांनी आरडा ओरडा केल्यावर जवळच असलेल्या अजमोद्दिन तडवी, मनोज पाटील आणि विष्णू पाटील धावून आले. त्यांनी अर्धा तास संघर्ष करुन भारत यांना बिबट्याच्या तावडीतून सोडविले. या घटनेत भारतच्या शरीरावर आणि पाय व हाताच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या पत्नीला कंबरेला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

बालकावर करणार होता हल्ला
शेतातच झोक्यात असलेल्या बालकावर बिबटा हल्ला करण्याचा तयारी होता. अचानक झोक्याकडे मुलाची आई मनीषा चव्हाण धावत आली. यामुळे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. हा प्रकार काही अंतरावर खुरपणी करत असलेल्या तिचे पती भारत चव्हाण याच्या लक्षात येताच त्यांनी बिबट्याशी दोन हात करून मनीषा यांनाही सोडवले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!