जळगाव । विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियाचा होणारा अतिवापर या विषयावर आठवी व नववीच्या विद्यार्थी व पालक संवादाचे विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी शिक्षकांनी मागदर्शन केल्यानतर आपल्या मुलांना सोशल मीडियाचा अतिरेकी वापर आपण करू देणार नाही, असा निर्धार पालकांन या परिसंवादात व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनीही दिले आश्वासन
सोशल मीडया या विषयावर पालक शिक्षक प्राचार्य यांची खुली चर्चा झाली. यात प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांनी पालकांशी संवाद साधताना आपल्या पाल्यांना केवळ रागवत बसण्यापेक्षा त्यांना समजून घेऊन त्यांचे मित्र बनावे त्याचबरोबर कामाव्यतिरिक्त मुलांना मोबाइल देऊच नये आणि इंटरनेट किंवा सोशल मीडियाचा वापर पालकांच्या समोरच वापर विद्यार्थ्यांनी करावा असे सांगितले.

प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांनीही मार्गदर्शन केले. या चर्चेतून नक्कीच सोशलमिडीयाचा अतिरेक थाबवून विद्यार्थी अध्ययनाकडे लक्ष देतील असा विश्वास पालकांनी व्यक्त केला आणि शाळेने हा संवाद घडवून त्याबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा कामाशिवाय मोबाईल हाताळणार नाही अशी ग्वाही आपल्या पालक व शिक्षकांसमोर दिली. यावेळी समन्वयक गणेश लोखंडे उपस्थित होत. प्रास्ताविक पियाली पुरोहित यांनी केले.

LEAVE A REPLY

*