Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव फिचर्स फोटोगॅलरी

जळगाव : श्रीराम रथोत्सव मिरवणूक (फोटो गॅलरी)

Share

जळगाव –

रथोत्सवाला सुरूवात झालेली असून फुलांच्या वर्षावात श्रीरामाच्या जयघोषात रथोत्सवाचे स्वागत होत आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रथोत्सवानिमित्त शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. रथोत्सवाच्या मार्गावर पोलिसांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच

राखीव पोलिस दलाच्या तुकड्या आणि पोलिस मुख्यालयातील कर्मचारीही बंदोबस्तासाठी आहेत. पोलिस विभागातर्फे गर्दी असलेल्या ठिकाणी रथोत्सवाचे व्हिडीओ शुटींगहीही केले जात आहे.

रांगोळ्यांच्या पायघड्या

श्रीरामांचा रथोत्सव म्हणजे प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग या दिवशी जळगावात येतात अशी भाविकांची श्रध्दा आहे. त्यामुळे साक्षात भगवंताचे दर्शन घेण्यासाठी व स्वागतासाठी रथोत्सव मार्गावर दारासमोर येणाऱ्या रथाचे जंगी स्वागत करण्यासाठी महिलावर्गाने घरासमोर भल्या मोठ्या रंगीबेरंगी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जात आहेत. अनेक दिवस सततचा पाऊस सुरू होता. त्यामुळे यंदाच्या दिवाळी सारख्या सणालाही दारापुढे रांगोळी काढण्याच्या आनंदावर पाणी फिरले. माझ आज पावसाची काहीशी उघडीप असल्याने रथाच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या दिसून येत आहेत.

मोगरी लावणाऱ्यांची भाविकांची लगबग

श्रीरामाचा रथ थांबविण्यासाठी मोगरीवर ठेवला जातो. या मोगरीवरूनच रथ वळविण्यासाठी हालचाल केली जाते. रथ ओढण्यासाठी दोरखंड लावण्यात आले आहेत. रथाच्या दोन्हीकडे दोरखंड सोडले जातात. या दोऱ्यांच्या सहाय्याने सेवेकरी व भविकांकडून रथ ओढला जातो. रथ ओढणे आणि त्याला थांबविण्यासाठी मोगरी लावणाऱ्यांची चढाओढ सुरू आहे.

ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप

रथोत्सवामध्ये भाविकांना भगर, साबुदाण्याची खिचडी, शेंगदाणे आदी प्रसादाचे वाटप भाविक भक्त आपापल्या परीने ठिकठिकाणी करत आहेत.केले जात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!