Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगाव श्रीराम रथोत्सव : रथाच्या पूजनास प्रारंभ काही वेळातच होणार रथोत्सवास प्रारंभ

Share

जळगाव – 

जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानातर्फे

कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त आज पहाटे चार वाजता काकडआरती, श्रीरामाच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक आणि त्यानंतर सात वाजता महाआरती करण्यात आली. यानंतर सांप्रदायिक पंचपद भजन झाले. आणि आता रथाचे पूजनास सुरूवात झाली आहे.

सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावाचे श्रीराम हे ग्रामदैवत आहे.  श्रीराम मंदिर संस्थानातर्फे कार्तिकी प्रबोधिनी, एकादशीला आज रथाचे पूजन होऊन रथोत्सवास प्रारंभ होईल. त्यामुळे जळगावनगरीत उत्साह, मांगल्य आणि चैतन्यपूर्ण वातावरणात निर्माण झाले आहे.

ओल्या दुष्काळाचे सावट

यावर्षी सर्वत्र अति पावसाने कहर केला असून ओल्या दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजुर पूर्णपणे खचून गेले आहेत. कष्टकऱ्यांच्या हातीही पैसा नसल्याने गुपचुप आहेत. दिवाळीही अंधारातच गेली. आज श्रीरामाचा रथोस्सव असून या रथोत्सवास अबालवृध्द दर्शनासाठी येत असतात. मात्र ओल्या दुष्काळाचा निरूत्साहाचा परिणाम रथोत्सवावर दिसून येत आहे.

१२ तास मांगल्याचा प्रवास

रथोत्सवाला दुपारी १२ वाजता सुरवात होईल. तेथून श्रीराम मंदिर, भोईटे गढी, कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, श्रीराम मंदिराच्या मागच्या गल्लीतून रथ चौक, बोहरा गल्ली, सुभाष चौक, दाणा बाजार, पीपल्स बँक, शिवाजी रोड, नेवे ब्रदर्स, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौकात रथ आणण्यात येईल. यानंतर श्री महालक्ष्मी मंदिर, श्री मरीमाता मंदिर मार्गे रथ चौकात रात्री १२ वाजेच्या सुमारास पोहचेल. सुमारे १२ तासांच्या रथाचा मंगलमय प्रवासामुळे अवघे जळगाव शहरात भक्तीमय वातावर निर्माण झाले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!