‘हरे रामा, हरे कृष्णा’च्या जयघोषात दुमदुमली जळगावनगरी

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-हरे रामा हरे कृष्णाचा जय घोष करीत शहरातून भगवान जगन्नाथांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला.
शहरातून निघालेल्या रथयात्रेचे निघालेल्या मार्गावर जल्लोषात स्वागत करण्यात आले असून शोभायात्रेत साकारण्यात आलेल्या सजिव आरासने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते.

आंतराष्ट्रीय कृष्णभवनामृत संघातर्फे शहरातून भगवान जगगन्नाथांचा रथोत्सव काढण्यात आला. रथोत्सवाची सुरुवात शिवतीर्थ मैदान येथून करण्यात आली.

महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते रथाचे पुजन करुन रथोत्सवास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रथ जाणार्‍या मार्ग साफ- सफाई करुन व रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.

त्यावरुन भगवान जगन्नाथांचा रथ मार्गस्थ होत होता. यावेळी भगव्या पताकाधारी साधकांनी हरे रामा हरे क्रिष्णाचा जयघोष करीत टाळ मृदुगांच्या तालावर ठेका धरला होता. यावेळी सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

सजिव आरासने वेधले लक्ष
भगवान जगन्नाथांच्या रथोत्सवा निमीत्त रथोत्सवात साधकांकडून राधा कृष्णांची सजिव आरास साकारण्यात आली होती. या सजिव आरासनी जळगाव करांचे लक्ष वेधून घेतले होते.

 

 

LEAVE A REPLY

*