शॉटसर्कीटमुळे अगरबत्तीच्या दुकानाला आग

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-शहरातील सुभाष चौकापासून जवळच असलेल्या पोलन पेठ मधील अगरबत्तीच्या दुकानाला शॉटसर्कीटमुळे आग लागल्याची घटना सायंकाळी 6.10 वाजेच्या सुमारास घडली.
या आगीत सुमारे 3 ते 4 लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की,पोलन पेठेत सुरेंद्र रोशनलाल नाथाणी यांच्या मालकीचे रोैशन अगरबत्ती एजन्सी दुकान आहे.

सायंकाळी अचानक शॉटसर्कीटमुळे दुकानाला आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने दुकानातील सुमारे 3 ते 4 लाखांचा सामान जळून खाक झाला.

आग लागताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

आग वाढत असल्याने दुकानाच्या दुसर्‍या बाजूला असलेला लाकडी दरवाजा तोडण्यात आला. यावेळी नागरिकांच्या मदतीने दुकानातील समान बाहेर काढण्यात आला.

आग विझविण्यासाठी सुमारे 3 बंब लागले. 20 ते 25 मिनीटांनी आग विझविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. घटनेची माहिती कळताच शहर पोलिस व शनिपेठ पोलिस स्टशेनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुरेंद्र नाथाणी यांनी दुकानात नवीन माल भरला असल्याचे समजते.

परिसरात निर्माण झाला गोंधळ
आग विझविण्यासाठी दुकानाच्या दुसर्‍या बाजूने असलेला दरवाजा तोडण्यावरून परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी भिंत तोडून आग विझविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या आगीबाबत पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे काम सुरु होते.

 

LEAVE A REPLY

*