Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

शिवशाही आता सामान्यांच्या अवाक्यात

Share
जळगाव । सुरू झाल्यापासून तोट्यात असलेल्या शिवशाहीच्या स्लीपर बसचे भाडे कमी करण्याचा निर्णय परिवहन विभागातर्फे घेण्यात आला असून यामुळे जळगाव-पुणे बसचे 285 रूपयांनी भाडे कमी होणार आहे. दरम्यान, सीटर व स्लीपर या दोन गाड्यांधील भाड्यामधील अंतर केवळ 65 रूपयांवर आल्याने स्लीपर गाडीही आता सामन्यांच्या अवाक्यात येणार आहे. 13 फेबु्रवारीपासून हे नवे भाडे लागू होणार आहे.

किती कमी झाले भाडे (रुपयात)
जळगाव पुणे बस भाडे 285, जळगाव मुंबई 300, जळगाव नाशिक 175, जळगाव औरंगाबाद 110, चोपडा पुणे 285, जळगाव नगर 190, विशेष बाब म्हणजे शिवाशाही सिटर बसचे भाडे हे जळगाव पुण्यासाठी 740 रूपये स्थीर असून त्यात व स्लीपर गाडीच्या भाड्यात केवळ 65 रूपयांचे अंतर असेल. आधी हा फरक 340 रूपयांपर्यंतचा होता.

सिझनमध्ये खासगी वाहतुकीला चाप
दिवाळीसह अन्य सणांत खासगी वाहनांच्या भाड्यांमध्ये अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली जाते. सामान्यांच्या अवाक्याबाहेरची ही भाडेवाढ असते. रेल्वे फुल्ल असल्याने शिवाय पर्याय नसल्याने खासगी वाहतुकीचा पर्याय नाईलाजास्तव प्रवाशांना निवडावा लागतो, अशा स्थितीत शिवाशाहीचे भाडे मात्र स्थिर राहणार असल्याने प्रवाशांना ही दिलासादायक बाब ठरेल, असेही सांगण्यात येत आहे.

स्पर्धा वाढताच भाडयात घट
जळगाव स्थानकाच्या प्रशासनाकडून मिळालेल्या माहितनुसार खासगी वाहतुकीचे दर शिवाशाही बसच्या तुलनेत कमी होते, शिवाय यात स्पर्धा वाढली आहे. प्रवाशांना आपल्याकडे वळविण्याकडे भाडे कमी करण्यावर अनेक दिवसांपासून विचार सुरूच होता. प्रवासी संख्या घटत असल्याने शिवशाही बस तोट्यात सुरू होती. शिवाय खासगी बसचे भाडे कमी असल्याने प्रवाशांचा ओढा खासगी बसेसकडे अधिक होता.

यासर्व बाबींचा विचार करून या स्पर्धेत टिकायचे असेल तर भाडे कमी केल्याशिवाय गत्यंतर नाही, हा निष्कर्ष निघाला व शिवशाही बस सुरू झाल्यापासून प्रथमच भाडे घटविण्यात आले. हेच भाडे आता कायम राहणार आहे. प्रत्येक टप्पा हा 6 किमीचा असतो त्यात 3.85 रूपयांनी प्रति टप्पा भाडे कमी करण्यात आले आहे. ते आधी 15.20 रूपये होते. ते आता 11.35 करण्यात आले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना 30 टक्के सवलत तर दिव्यांगांना 70 टक्के सवलत देण्यात आली आहे. जळगावात सध्या तीनच शिवशाही स्लीपर बसेस सुरू असल्याचीही माहिती मिळाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!