जातपडताळणी कार्यालयातील अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

0
जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-सध्या सर्वत्र शैक्षणिक प्रवेशांसाठी विद्यार्थी शाळा, महाविद्यांमध्ये रांगेत दिसत आहेत. त्यातच जातपडताळणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही.
त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होवु पाहत आहे. त्यामुळे गैरहजर राहणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध शाखेती शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व विविध क्षेत्रातील नोकरदार वर्गांना जात पडताळणी आवश्यकता असते.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी जातपळताळणी प्रमाणपत्राची गरज असते. विद्यार्थी व नोकरदार वर्गांनी जातपळताळणी प्रमाणपत्रासाठी जात पळताळणी विभागाकडे अर्ज केले आहेत.

मात्र अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे व कर्मचार्‍यांच्या निष्काळीपणामुळे विद्यार्थ्यांना व नोकरदारांना जात पळताळणी प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही.

काही प्रस्तावांमध्ये त्रुटी असतील तर त्याचीदेखील वेळेवर पुर्तता करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षकिण नुकसान होवु पाहत आहे.

तसेच नोकदार वर्गातील काहींना तर त्यांची नोकरी गमाविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निष्काळीपणा करुन सतत गैरहजर राहणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांवर कारवाई करुन विद्यार्थी व नोकदरांना न्याय द्यावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.

तसेच शिवसेना महानगरतर्फे जात पळताळणी कार्यालयास कुलूप लावुन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातुन देण्यात आला आहे.

निवेदनदेतेवेळी मानसिंग सोनवणे, गणेश गायकवाड, राहुल नेतलेकर, राहुल शिंदे, विजय राठोड, सोहम विसपुते, खुशाल सुर्यवंशी, नाना भालेराव, मोहन यादव, बाळु सपकाळे, ज्योती शिवदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*