Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या राजकीय

भाजपच्या बंडखोर उमेदवाराची शिवसेना प्रमुखांकडे तक्रार : ना.गुलाबराव पाटील

Share

जळगाव (प्रतिनिधी)

आज विधानसभा निवडणूक प्रचारसभेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही वेळातच जळगावात आगमन होत आहे. या सभेसाठी जळगाव, धुळे, नंदुरबारसह इतर जिल्ह्यातूनही भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोदींचे चाहते सभास्थळी पहाटेपासून येऊ लागले आहेत. याठिकाणी भाजप व शिवसेनेचे आमदार, खासदारांसह विविध पदाधिकारी सुध्दा पोहचले आहेत.

जळगाव ग्रामीणचे भाजप-सेना युतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तथा सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची उपस्थिती असून त्यांनी सभेत बोलण्याची संधी मिळण्याची मागणी केली आहे.

भाजपचे बंडखोर उमेदवार पंतप्रधानांचा आदेश मानतील का?
जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर मतदार संघात भाजपचे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्याठिकाणी ते भाजपच्या नावावर प्रचार करत आहेत. त्यांच्यांबद्दल मी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचेकडे लेखी तक्रार दिली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना थांबवावे अशी अपेक्षा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभा सुरू होण्याच्या अगोदर प्रसार माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!