Type to search

Featured आवर्जून वाचाच जळगाव विशेष लेख

मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा पोवाडा गातो शिवाजीचा…

Share
Jalgaon

शिवरायांचे गुरु कोण ?

जळगाव :

महात्मा ज्योतीराव फुले यांनी छत्रपती शिवरायांचा 900 ओळीचा पोवाडा लिहीला होता. त्याचे कारण असे झाले 1869 मध्ये ज्योजीबांनी आपल्या शिवप्रेमी मित्रांना घेऊन रायगडावर चार दिवस मुक्काम ठोकन शिवरायांच्या समाधीपर्यंत जाण्यासाठी वाटेत येणारी झुडपेे, काटे, कुटे कुर्‍हाडीने साफ करुन रस्ता तयार केला. समाधीची साफसफाई केली. स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर फुले वाहिली. ही हकीकत तेथील ग्रामभटास कळाल्यावर तो तणततणत तिथे आला. कुणबट शिवाजीच्या थडग्याच्या देव कोण? मी ग्रामजोशी असतांना दक्षिणा, भिक्षा देण्याचे राहिले बाजूला, केवढा माझा अपमान असे म्हणत लाथेने समाधीवरील फुले उधळून दिलीत, वर परत म्हणाला, अरे कुणबटा तुझा शिवाजी काय देव होता ? म्हणुन त्याची पुजा केलीस. ही गोष्ट ज्योतीरावांना बोचली, ते म्हणतात त्यांच्या पेशव्याचा धनी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील पुजा सामग्री या भट भिक्षुकाने पायातील पादत्राणाने लाथाडावी काय?

1869 मध्ये त्यांनी पुण्यात परत येवून शिवप्रेमी नागरिकांची सभा घेतली. या सभेत तीन ठराव मंजूर करण्यात आले. त्यामधे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात यावा, रायगडावरील भग्न शिवरायांच्या समाधी दुरुस्तीसाठी निधी उभारण्यात यावा, ज्योतीराव फुले यांनी शिवरायांवर पोवाडा लिहावा. शिवजयंती महोत्सव महात्मा फुलेंनी 1869 मध्ये केला. याची नोंद पोलिस अभिलेखात आजही उपलब्ध आहे. पोलिसांनी पुण्याच्या ब्रिटीश गव्हर्नरला दिलेल्या अहवालात वरील ठरावाची नोंद आहे.

आज काही मंडळी शिवजयंतीची सुरुवात बाळ गंगाधर टिळकांनी केली आहे असे बेधडक पसरवतात आणि महात्मा फुलेंचे श्रेय टिळकांना देतात. तसाच प्रयत्न शिवरायांचे गुरु रामदास आणि दादोजी कोंडदेव होते असा अपप्रचार केला जातो आहे. आपण काल्पनीक कथा, कादंबर्‍या, नाटके नव्हे तर समकालीन ऐतिहासीक साधनांवरुन प्रत्यक्ष परिस्थीती पहूा.
रामदास गोसावी
न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे यांनी मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ 1899 मध्ये लिहीला. या ग्रंथात संतांच्या कामगिरीवर एक विशेष प्रकरण लिहीले. जातीपातीतील विषमता कमी करुन संतांनी महाराष्ट्रातील भुमी ऐक्य भावनेने नांगरुन तयार केली. त्या जमिनीत स्वातंत्र्याचे बियाणे पेरणे जिजाऊ शिवबास शक्य झाले. या संत प्रकरणात संत तुकाराम महाराजांना विशेष श्रेय स्वाभाविकपणे देण्यात आले. त्यांच्या अभंगातून व्यक्त होणार्‍या समाजविषयीच्या तळमळीला शिवशाहीच्या उदयाचे श्रेय दिले. तुकाराम शुद्र कुणबी मराठा व त्यांना इतके मोठे स्थान दिल्याने पुणे व कोकणातील ब्राह्मणाचा पोटशुळ उठला. या संतापाला वाट करुन देण्यासाठी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी राष्ट्रगुरु रामदास हा लेख लिहीला.

जुना दासबोध जो एकवीस समासी आहे, जो रामदासांनी लिहीला आहे. त्यात कुठेही रामदासांनी स्वतःला शिवरायांचा गुरु म्हणुन लिहीलेले नाही. ल. रा. पांगारकर आणि राजवाडे यांनी ओढून ताणुन हा बादरायण संबंध जोडण्याचा खटाटोप केला आहे. या समासांच्या रचना काळासंबंधी संत साहित्याचे वस्तुनिष्ठ अभ्यासक म. ना. धोंड यांनी दासबोधाचा रचनाकाळ आणि शिवरायांच्या आयुष्यातील घडामोडी यात असलेली विसंगती निदर्शनास आणून पागारकरांच्या शिवसमर्थ या कल्पीत कथेला फोल ठरवले आहे.

1642 मध्ये शहाजीराजेंनी बंगरुळ येथून पुणे, सुपे या वैयक्तीक जहांगिरीवर शिवबांना पाठवतांना सोबत आपले विश्वासू सहकारी शामराव निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजूमदार, सोनोपंत डबीर, अत्रे, सबनीस अशी मातब्बर मंडळी दिली होती. तसेच स्वतंत्र राजा म्हणुन पुढील कारभार करता यावा म्हणुन स्वराज्य निर्मीतीसाठी आवश्यक असे भगवा झेंडा, राजमुद्रा, हत्ती, घोडे दिलेत. भगवा झेंडा हा ध्वज शहाजीराजांनी 1642 मध्ये स्वतः दिला आहे.

इ. स. 1647 पासून शिवरायांनी बारा मावळच्या आसपासचे आदिलशहाचे किल्ले घेण्यास सुरुवात केली. राजमुद्रा असलेले पहिले पत्र शिवरायांनी 1646 मध्ये लिहीलेले आहे.

रामदासी पंथाची स्थापना इ. स. 1649 ची हा पंथ स्थापन झाला. आदिलशाहीत स्वराज्यात नाही त्यांच्या चाफळ देवस्थानचे विश्वस्त छत्रपती शिवाजी महाराज व शहाजी राजे यांचे शत्रु बाजी घोरपडे व मुरार जगदेवराव यांचे गरुत्व रामदासाने स्विकारले होते.(इति) नरहर कुरुंदकर यांनी स्वतःच्या मालकीची तसेच विजापूर दरबारातील जमीन चाफळच्या देवस्थानाला दिली होती.

मुस्तफाखानाने शहाजी राजेंना कपटाने कैद केले होते. त्यावेळी बाजी घोरपडेने त्याला मदत केली होती म्हणुन त्यानंतर 16 वर्षांनी 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी त्याचा निकाल लावला होता. रामदास जर शिवरायांचा गुरु असता तर आपल्या गुरुबंधुला शिवरायांनी का मारले असते? बाजी घोरपडे व मुरार जगदेवराव हे शहाजी राजेंना पहात. शहाजीराजेंच्या खाजगी पुणे, सुपे प्रांतात जाळपोळ करुन त्यांनी तिथे गाढवाचा नांगर फिरवला. मुररार जगदेवरावाने तिथे मोठी पहार ठोकुुन त्यावर तुटक्या चपलेचा हार घातला व पंचक्रोषीत दवंडी दिली की, जो कोळी या भुमिवर नसती अथवा शेती करेल त्याचा निर्वंश होईल हा या ब्राह्मणाचा शाप आहे.

शिवरायांनी 1645 पासून स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरु केले. 1672 पर्यतं सर्व गोष्टी आवाक्यात आल्यानंतर त्यांनी राज्याभिषेकाची तयारी सरु केली. राज्याभिषेकासाठी तुम्ही शुद्र आहात म्हणुन महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला. महाराजांनी काशीच्या गागाभट्टला 2 कोटी दक्षीणेची लालूच दाखवून 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक करुन घेतला. ऐतिहासीक दस्ताऐवजात 3 एप्रिल 1672 मध्ये रामदासाने छत्रपती शिवरायांना काव्यात्मक पत्र त्यांच्या शिष्याकरवी पाठवले आहे.

निश्चयाचा महामेरु । बहूत जनांसी आधारु ॥
अखंड स्थितीचा निर्धार । श्रीमंत योगी ॥

अशी सुरुवात करुन पहिले सहा समास महाराजांचे वैयक्तीक गुणगान करणारे आहेत. त्यात उत्कृष्ट उपमा वापरल्या आहेत. त्यानंतरच्या सहा समासात त्यांच्या पराक्रमाचे वर्णन केले असे लिहून धर्म तुमच्यामुळे शिल्लक आहे असे लिहीले आहे. शेवटच्या तीन समासांपैकी तेराव्या समारास तुमच्या राज्यात वासतव्य केले. विस्तारणाने तुमची भेट घेऊ शकलो नाही.
तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले नाही

ऋणानुबधे विस्मरण झाले । काय नेणू ॥13॥
उदंड राजकारण तरले । तेणे चित्र विभागले
प्रसंग नसता लिहीले । क्षमा केली पाहिजे ॥15॥

13 व 15 व्या समासात स्पष्ट लिहीले आहे की, विस्मरण झाल्याने मी आपली भेट घेऊ शकलो नाही आणि प्रसंगी नसतांना लिहीले म्हणुन राजांनी दयावंत होऊन पामराला क्षमा करावी.
तिसर्‍या समासात रामदासाने शिवरायांना छत्रपती संबोधीत केले आहे. म्हणजे त्यांना दिसत होते की शिवराय आता राज्याभिषेक करुन घेणार आणि परळीचा किल्ला जर त्यांनी घेतला तर त्यांचे कृपाछत्र रहावे यासाठी हे पत्र लिहीले आहे. रामदासाच्या अंदाजानुसार परळीचा किल्ला एप्रिल 1673 मध्ये शिवरायांनी जिंकुन घेतला. पुढे हा किल्ला सज्जनगड म्हणुन प्रसिध्द झाला. रामदासाने केलल्या माफीनामा कम पत्र प्रपंचामुळे त्याचे पूर्वीचे अपराध माफ करुन शिवरायांनी त्यास सज्जनगडावर वास्तवय करु दिले.

म्हणजे एप्रिल 1672 पयर्ंत रामदास शिवरायांची भेट ही झाली नव्हती हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. पुढे जुन 1674 मध्ये रामदास राज्याभिषेकासही उपस्थित नाही हे देखील सत्य आहे. 22 जुलै 1672 मध्ये शिवरायांनी दत्ताजीपत व गणेश गोजदाऊ यांना दिलेल्या आज्ञेतील मजकुर असा.
रामदास गोसावी व देवाकरीता जसे ब्राह्मण तेथे येऊन …… त्याचा परमार्थ घ्यावा. या आज्ञापत्रात रामदास गोसावी असा एकेरी उल्लेख आहे. त्याच्यापुढे श्री देखील लावलेले नाही. यावरुन रामदासाची शिवरायांच्या राज्यात काय प्रतिष्ठा होती हे स्पष्ट होते.

पुन्हा 8 ऑगस्ट 1676 म्हणजे राज्याभिषेकाच्या दोन वर्षानतर शिवरायांचे प्रधानमंत्री मोरोपंत यांनी दसमाजी नरसाला सरहवालदार केले. महिपतगड व जिजोजी काटकर हवालदार व कारकुन किले सज्जनगड यांना लिहीलेल्या पत्रात श्री गोसावी सिवतरी (शिवथरी) रहातात. सांप्रत काही दिवस गडासी रहावयास किले यास येतील असा उल्लेख आहे.

या पत्रात देखील रामदासांचा उल्लेख श्री गोसावी असा आहे. त्यांचे नाव देखील पत्रात घेतलेले नाही. रामदास शिवरायांचे गुरु असते तर असा वैयक्तीक रामदास म्हणुन नामोल्लेख न करता श्री गोसावी असा उल्लेख मोरोपंतांनी केला असता का ? म्हणजे आपल्या राज्यातील भट, भिक्षुक गोसावी यांची राजे काळजी घेत तशीच रामदासाचीही काळजी घेतली आहे आणि विशेष तोपर्यंतही रामदास व शिवरायांचे प्रत्यक्ष भेट झालेली नाही. रामदासास शिवरायांचे धार्मीक व राजकीय कार्य जर अभिमानास्पद वाटत असते तर त्यांनी ते ज्यांचे आश्रीत होते त्या बाजी घोरपडे व मुरार जगदेवरावास स्वराज्याच्या निरोपातील कारवाया करण्यापासून थोपवायला पाहिजे होते. अन्यथा त्यांच्या वतनावर लाथ मारायला पाहिजे होती. अन्यथा त्यांच्याच शब्दात,

सांडोनीया श्रीपती । जो करी नर स्तुती ।
का दृष्टी पडील्याची वर्णी किर्ती । तो एक पढत मुर्ख ॥

………. शिवरायांना आयुष्यात भेटल्याचा एकही ऐतिहासीक कागद नाही. शिवरायांच्या गुरुपदी बसविणयाचे काम पेशवेकालीन चिटणीस बखर व रामदासी हनुमान स्वामीची (ही पण पेशवेकालीन) बखर म्हणजे शिवरायांच्या नंतर 100-125 वर्षानतर लिहीलेल्या बखरींमध्ये रामदास तुडूंब भरला आहे. हनुमान स्वामींचे ठिक आहे, आपल्या गुरसाठी तो वाटेल ते लिहील पण पेशव्यांच्या संमतीने चिटणीसाने देखील हा उद्योग केला आहे. हा चिटणीस म्हणजे छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्य द्रोही चिटणीसाला हत्तीच्या पायी दिले त्याचा वंशज.

क्रियाहीन व मुढगती ब्राह्मण असला तरी त्याला गुरु म्हणावे. देव त्याला वंदन करतात मग सामान्य माणसाचे काय ? ……. असला (मूढमती) तरी ब्राह्मण जगात वंदीला जातो. हीच विचारधारा घेऊन राजवाडे, पांगारकर, देव, पुरंदरे आदि मंडळींनी उत्तरकालीन अविश्वसनीय बखरींच्या आधारे रामदासाला तुकारामांपेक्षा श्रेष्ठ ठरवण्यासाठी शिवरायांचा गुर केला आणि हनुमान स्वामीने तर कळसच गाठला.

इतिहासाला मा. म. देशमुख यांनी पुराणानिशी रामदास आदिलशहाच्या आश्रीतच नाही तर हेर होता असे पुस्तक लिहीले. आचार्य अत्रेपासून अद्ययावत ब्राह्मणांनी त्याला विरोध केला व नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करुन या पुस्तकावर बंदी आणावी अशी विनंती अर्ज दाखल केला. मा. म. देशमुख त्या खटल्यात विजयी झाले आणि नागपूरात त्यांची मिरवणूक निघाली होती.

ही झाली जुनी गोष्ट. काल परवा म्हणजे 2018 साली रामदास बसलेले व दिशा निर्देश करता आहेत व शिवराय तिकडे उभे राहून बघत आहेत असा देखावा अहमदनगर येथील शाळेच्या मिरवणुकीत उभा केला म्हणून संजय बबनराव भोर यांनी लक्ष्मीकांत कृष्णराव कुळकर्णी, विश्वास यशवंत भालेराव व दमयंती कमलाकर कुळकर्णी या संस्था चालकांवर पोलिसात फिर्याद दिली. त्याला कुळकर्णी आदिंनी औरंगाबाद हायकोर्टात चॅलेंज करुन हा इतिहास आहे व त्यामुळे ही फिर्याद रद्द करावी असा दावा केला व फिर्याद रद्द करावी असा अर्ज दिला.

औरंगाबाद उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूकडचा युक्तीवाद ऐकल्यानंतर रामदास शिवरायांची आयुष्यात भेट झाली नसल्याचे मान्य करुन फिर्याद योग्य असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करावा असा आदेश दिला आहे. हे नागपूर व औरंगाबाद उच्च न्यायालयाचे निर्णय तसेच इतिहास तज्ञांनी समकालीन विश्वसनीय ऐतिहासीक दस्ताऐवजांची माहिती असल्याने महाराष्ट्रातील नेते शरद पवार यांनी देखील रामदास शिवरायांचे गुरु नव्हते अशी स्पष्ट टिपणी केली आहे.
– सुरेंद्र पाटील
मराठा सेवा संघ (7588009905)

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!