Type to search

जळगाव

पूरग्रस्तांसाठी शेगाव संस्थानकडून १ कोटी ११ लाखांची मदत

Share

शेगाव | राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस शेगाव येथे महाजनादेश सभेच्या निमित्ताने आले असता त्यांनी श्रीं चे मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले.याप्रसंगी श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी मुख्यमंत्री महोदय यांचेसह अन्य मंत्र्यांचे स्वागत करून शाल श्रीफळ तसेच श्री प्रसाद देऊन सत्कार केला.

यावेळी केंद्रीय मंत्री ना संजय धोत्रे,ना डॉ संजय कुटे ना गिरीष महाजन, ना डॉ रणजित पाटील,विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष ना चैनसुख संचेती जि प यात्राप्रमुख आ सुमित ठाकूर,आ आकाश फुंडकर जि प अध्यक्ष सौ तायडे, भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे,जि प महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले पाटील,जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख,नंदू अग्रवाल, यांचेसह अन्य स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.श्री गजानन महाराज संस्थानकडून कोल्हापूर सांगली सातारा येथील पुरग्रस्तांसाठी १ कोटी ११ लक्ष रुपयांचा मदतनिधीचा धनादेश मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. याप्रसंगी श्री ग म संस्थान चे विश्वस्त मंडळीची उपस्थित होते. मंदिरात श्रींचे दर्शन घेतांना मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील व अन्य मंत्री उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!