येरे येरे पावसा, तुला देतो पैसा

0
paper boat sailing

पावसाचं आणि आपणा सर्वांच नात जुळते ते ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ याबडबड गीतानं. घरात असो वा बालवाडीत हे गाण हमखास शिकवल जात. पत्र्याच्या छतावरून पडणारी पावसाच्या पाण्याची धार असो वा पहिल्या पावसात घामोळ्या जाण्यासाठी ते भिजणं असो. अंगावर शहारे आणि रोमांच आल्याशिवाय राहत नाहीत. पुर्वी कस पावसाचा पाहूणा चार महिने थांबायचा.

आठ महिने पुरेल एवढ अमृताचे दान देऊन तो गुडूप व्हायचा. हिवाळ्याच्या दिवसात त्याची आठवण येत नसली तरी वैशाखात मात्र तो आता यायलाच हवा असा आग्रह असायचा. या आग्रहाचा मान ठेवून तो बरसायला माणुस थोडीच आहे. पण माणसासारखा प्रेमळ, मायाळू जीवाला जीव देणारा आणि समस्त सजीवांना फुलविणारा आहे तो.

कवी मनाला तो हुरळ घालत असतो. तर उद्योजकाला तो कामाला लावत असतो. त्यांच्या पहिल्या वहिल्या सरीन सार रान कस अवचित हिरवकंच होत असत. आसमंतही काळ्या निळ्या मेघांनी आक्रमिलेले असते. आणि अशातच शितल वार्‍याची मंद अशी झुळूक येते. अंगावर आणि मनावर एक वेगळेच शहारे उमटून जातात. कधी ते दीर्घकाळ मनात वास करत असतात तर कधी ते अल्प ठरत असतात. असा हा पाऊस…

पावसाचं आणि आपणा सर्वांच नात जुळते ते ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ याबडबड गीतानं. घरात असो वा बालवाडीत हे गाण हमखास शिकवल जात. पत्र्याच्या छतावरून पडणारी पावसाच्या पाण्याची धार असो वा पहिल्या पावसात घामोळ्या जाण्यासाठी ते भिजणं असो. अंगावर शहारे आणि रोमांच आल्याशिवाय राहत नाहीत. पुर्वी कस पावसाचा पाहूणा चार महिने थांबायचा. आठ महिने पुरेल एवढ अमृताचे दान देऊन तो गुडूप व्हायचा.हिवाळ्याच्या दिवसात त्याची आठवण येत नसली तरी वैशाखात मात्र तो आता यायलाच हवा असा आग्रह असायचा. या आग्रहाचा मान ठेवून तो बरसायला माणुस थोडीच आहे.

पण माणसासारखा प्रेमळ, मायाळू जीवाला जीव देणारा आणि समस्त सजीवांना फुलविणारा आहे तो. कधी तो भरभरून देतो की आपलीच झोळी फाटून जाते आणि तो सु..सू.. करत वाहत धावत नदी नाल्यातून त्याचा प्रवास सुरू होतो. मार्गात येणार्‍या सर्वांना तो सोबत घेवून जातो. हा या सोबतीत मात्र काहींना काठावर ढकलून जातो. तर काहींना मात्र पोटातच गडप करतो. अगदी त्या सीतामाईसारखं. या प्रवासात तो अनेकांना नवचैत्यन्य देत असतो.

तर अनेकांचे चैत्यन्य उध्वस्त करत असतो. म्हणतात एक हाथ से दो, दुजे हाथ से लो. ज्यांना मिळाले ते सुखी झाले. ज्यांनी गमावल. ते मात्र त्याला शिव्याची लाखोली वाहतात… तेही काळाच्या ओघात दू:ख दूर होताच तेही त्याच स्वागत करतात.

लहाणपणी वर्गात असतांना जर तो आला तर आम्हा सर्व बालकांना कोण आनंद होत असे. वर्गावर पत्र्याचे छत असल्याने तो माजंर पावलाने आला तरी अगदी वाघासारखा आल्याचा भास व्हायचा. त्यामुळे गुरूजींचा शिकवण्याचा आवाज त्या पावसाच्या आवाजात कोठे गडप व्हायचा ते कळत नसे. त्यातच वीज गेली तर बल्बही गाढ झोपी गेल्याने वर्गात अंधार व्हायवा. परिणामी गुरूजीही शिकवणे सोडून पावसाचा आनंद घेत असत.

अशावेळी वह्यांच्या मागणी पाने टराटर फाटत आणि त्यांच्या कागदी होड्या तयार होत. वर्गाच्या पत्री छतावरून पडणार्‍या पावसाच्या धारेमुळे तयार झालेला मायक्रो नदीत या होड्या पटापट टपकत आणि जो तो आपली होडी पुढे कशी जाईल याचा प्रयत्न करत. तर दुसर्‍याची होडी पाण्यात भिजून जागीच ठिय्या कशी मांडून बसेल याकडे लक्ष दिले जाई.

तर काही वर्गात गुरूजी चला पोरांनो मोठ्याने पाढे म्हणायला लावत. तर काही गुरूजी पोरांनी अंधारात मार्‍यामार्‍या करून गोंधळ घालु नये म्हणून एक दोन तीन, एकदोनतीन, एक दोन तीन या स्वरूपात टाळ्या वाजवायला सांगत. बाहेर खरा पाऊस पडत असतांना वर्गात मात्र टाळ्या एका विशिष्ठ लयीत वाजवण्यास सांगत. त्यामुळे हळूहळू येणारा पाऊस जसा जोर पकडून मुसळधार, धुव्वाधार पडण्याचा आवाज जसा यायचा तसाच आवाज या टाळ्यांच्या वाजवण्यातून यायचा. मग काय गुरूंजीसह पोरेही खुश.

एका वर्गातील या टाळ्यांच्या पावसाचा आवाज ऐकून शेजार्‍याचीही वर्गातून मग टाळ्यांचा पाऊस सुरू होत असे. या पावसाच्या आवाजत वर्गातील पत्री छताला मात्र चांगलीच धार लागलेली असे. त्यामुळे त्या जागेवरचा पोरगा गुरूजींच्या खुर्चीजवळ पुढे येवून बसत असे.

पाऊस थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने अखेरीस हेडमास्तर शाळा सुटल्याची घंटा टनाटना वाजवायचे. मग काय सारी पोरी पाटीखाली पुस्तके, वह्या ठेवूत पाटी डोक्यावर घेवून घराकडे धुम ठोकायचे. तर काही जण पावसात येथेच्छ चिंब व्हायचे. कशाचीही पर्वा न करता. मात्र हा आनंद काही वेळापुरताच राहत असे. कारण घरी गेल्यावर माय किंवा बाप नावाच्या व्यक्तीकडून मग पाठीवर चापट्याचे फटके असत.

मेल्या कशाला रे पावसात भिजला. आता सर्दी हुईल, ताव येईल.. या आणि अशाच बर्‍याच पदव्यांची खैरात व्हायची. मार बसल्याने पोरंगही हूंदकून हुंदूकन रडायच नी आजी किंवा आजोबाकडे जात बसायच. काही वेळान हाच बाप नी माय येरे माझ्या सोन्या असे म्हणून मायेने डोक्यावरून, गालावरून हात फिरवून मकू घेत समजावत असे. पोरगही आता नाय करणार माय. पण तूच सांगत व्हती ना की पहिल्या पावसात भिजल्याने घामोळ्या जातात…. असा हा पाऊस आणि अशा या बालपणाच्या आठवणी. खरच पुन्हा हवेहवेसे वाटते.

शाळेतील शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या कॉलीजात येतो. जबाबदारीची थोडी जाणिव, करीअरची चिंता आणि ……. .यातच हे फुलपाखरू उडत असत. यातच कधी ‘त्याची त्याच्याशी’ किंवा ‘त्याची तीच्याशी’ घट्ट मैत्री जमलेली असते. हिवाळा, पावसाळा या ऋूतूत मात्र तो किंवा ती हमखास छत्री आणत असे. कालीजात (कॉलेजात) येतांना म्हणा की जातांना किंवा क्लासला ‘ तो’ जर आलाच तर…. ‘तीच्या’ डोक्यावर छत्री धरून ‘हा’ अर्धाउर्धा नव्हे तर पूर्ण पावसात भिज़त तीला तीच्या घराजवळ सोडून देत असे. ‘या’ चालण्यातही वेगळा आनंद मिळत असे.कधी हलकासा स्पर्श होई. तेव्हा मनमोराचा पिसारा आगुतुकपणे फुलत असे. तर अंगावर ‘ शहारे’ उमटत. आणि अशातच ……

‘बरसात मे हमसे मिले तुम, तुमसे मिले हम’ यासारख्या गीतांच्या ओळी मनात धुमाकूळ घालत. किंवा ‘ टिप टिप बरसा पाणी..’ यासारख्या पावसाळी गाण्यांनी मन पार चिंब होत असे. पावसात वार्‍यासोबत येणारा तो ‘ गारवा’ अंगाला नी मनाला मोहरून टाकत असे. यात त्याची तीच्याशी किंवा तीच त्याच्याशी असलेले ऋणानुबंध अधिकच मजबुत होत ‘ साथ जीऐंगे…’ पर्यंत प्रवास होत असे. यात कोणी यशस्वी होत असले तरी पुढील जीवनात मात्र असा प्रसंग मात्र कधीच अनुभवता येत नाही. अपयशी झाले तर आठवणींचा हिंदोळ्यात अनेक पावसाळे जात असतात. तर कधी सारी मुले मुले किंवा मुली मुली एक दोघींच्या छत्रीत जाणे येणे करायच्या. यातून मैत्रीचे बंध अधिक द़ृढ होत.

काळाच्या ओघात परिवर्तनाच्या लाटेत हे बालपण आता हरवून वयाने आणि शरिरानेही मोठेपणा धरला असतो. शेती, नोकरी, बायका पोर यांच्यात गुंरफटला जातो. ऑफिसला निघातांना किंवा ऑफिसमधून घरी जातांना ‘ हा’ आला तर मात्र चिडचिड होते. तर कधी चला बरे झाले घरी गेल्यावर बायकोला सांगुन गरमा गरम भजे नी गवतीचहा टाकलेला चहाचे घोट घेत परिवारासोबत खिडकीतुन पावसाची मजा लुटण्याचा प्लॅनही तयार होतो. तर कधी दुसर्‍या दिवशी रविवार असेल तर मग घराच्या गच्चीवर जात पावसात मनमुराद चिंब होण्याचा आनंदही लुटला जातो. असा हा शहरातला पाऊस.

शेतकर्‍याचा पाऊस म्हटला की पिके निघेपर्यंत तो यायला हवा. कधी मुसळधार तर कधी रिमझिम, तर कधी झडी. कारण तो लाखोंचा पोशिंदा असतो. त्याच्या भूमातेला पावसाच्या पाण्याने तृप्त करून विहीरी, नदी नाले, ओढ्यांतून पाणी खळखळणार हव असत. त्याच सुख सार त्या पावसाच्या पाण्यावर. वरूण देवता त्याच्यावर प्रसन्न झाली तरच तो जगाला प्रसन्न करतो. शेतकरी दु:खी झाला तर प्रत्यक्ष म्हणा की अप्रत्यक्ष त्याचे विपरीत परिणात शहरी जीवनावर होतातच. असे असले तरी शेतकर्‍यांला मात्र पाऊस पडो वा ना पडो चिंता नावाची चेटकीन त्याची पाठ काही सोडत नाही. मुसळधार पडला तर शेतातील मातीसह पिके वाहून जाण्याचा धोका,सतंत धार पडला तर पिके पिवळी होण्याचा धोका, रिमझिम पडला तर विविध प्रकारची किटके पडण्याचा धोका.

तर कधी उभे पिक अर्ध्यावर मोडून पडण्याचा धोका. याचा शहराला काहीच फरक पडत नाही. मात्र शेतकर्‍यांला पडतो. निसर्गाच्या या रौद्र रूपाकडे तो एकटक पाहत नशिबाला दुषणे देत बसतो. तर शासन नावाच्या संस्थेकडून मदतीची आस धरतो. शासनही मदतीची घोषणा करते. करोडे रूपये शासनाकडून गावापर्यत येतात. परंतू थेंब थेंब गळतच. बरे ते ओल तर ते हातात पडण्यासाठी झारीतील शुक्राचार्यांना लक्ष्मी दर्शन द्यावे लागते. ते दिले तर छदाम मिळते. की ज्यात शेतकर्‍यांला कोणताही दिलासा मिळत नाही. पुन्हा कर्ज पुन्हा आत्महत्या असेच चक्र सुरू राहते. मात्र राजा, राजाचे प्रतिनिधी आणि आयएएस, आयपीएस नोकर सुखांच्या राशीत लोळत असतात. असा हा पाऊस.. आता तर हा पाऊसच चांगला रुसला आहे. क्षणाक्षणाला रंग बदलणार्‍या माणसांप्रमाणे तोही बाराही महिने लहरीपणे येतो. कोणाला सुखावतो तर कोणाला दुखावतो. तर कोठे तरी दुरवरच्या इंग्राजळलेल्या शाळेत पावसाची कविता ऐकू‘रेन रेन गो अवे

कम अनदर द डे’ आणि खरच जगातल्या एवढ्या लहाण देवाघरच्या फुलांच देव ही ऐकतो. आणि तो म्हणतो ‘येस येस आय वुल कम अनदर डे’ आणि त्याचा हा अनदर डे कधीही केव्हाही येतो.पण प्रत्येकवेळी तो काहीना काही शिकवत असतो. त्याच्या पहिल्या पावलातच सारी धरा हिरवा शालू नेसते. ओसड भकास झालेले रानात नवचैत्यन्य फुलते. नदीतुन पाणी खळाखळत वाहू लागते. सारे लहानलेले जीव हे पावसामृत सेवन करून तनामनाने तृप्त होतात. दुसर्‍या तीसर्‍या पावलात तो भूमातेच्या गर्भात जात विसावतो.

नदी नाले कोरडे पडले तरी तो विहीरीतून तो या जीवसृष्टीला नवचैतन्य देत असतो. तो देतांना कोणताही भेदभाव न करता अमाप देतो. आणि म्हणूनच ही सारी जीवसृष्टी टिकून आहे. त्याच फक्त ऐच मागणं आहे. आणि ते म्हणजे त्याचा आणि आपणा सर्वांचा प्राण सखा असलेले जंगल जगवाण्याचं. विज्ञानाने माणूस चंद्रावर मंगळावर गेला. कृत्रीम पाऊसही पाडू लागला. पण अस्सल पाऊस हवा असेल तर वृक्षवल्ली जगवलीच पाहीजे. सर्व जीवसृष्टी जगली पाहिजे. वृक्षवल्ली जेथे आहे तेथेच वरूण राजाचा निवास आहे. असे सर्वच धर्मग्रंथातच नव्हे तर आजच्या संशोधीत विज्ञानाच्या पुस्तकातही नमुद केले आहे. असा हा पाऊस….. कवी मनाला, लेखकांना उत्स्फूर्तपणे शब्दबध्द करण्यास लावणारा हा पाऊस. किंबहूना सर्वानाच कामाला लावणारा हा पाऊस…. चला पुन्हा नव्याने सुधारीत करून म्हणू या…
‘येरे येरे पावसा, तुला देतो वृक्षाची मेवा’
पंकज पाटील – 7588822126

LEAVE A REPLY

*