Type to search

Breaking News जळगाव

शाहूनगरात अतिक्रमणावर हातोडा

Share

जळगाव  – 

शाहू नगरातील अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभागाने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली  व उपायुक्त गुटे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुचर्चित  व वादातीत शाहू नगरातील अतिक्रमणावर मनपाने हातोडा मारला. यावेळी संपूर्ण शाहू नगर परिसरात बघ्यांची गर्दी होत होती.

100 वर अतिक्रमणे

शाहू नगर परिसरात पोलिस चौकीकडून ट्राफीक गार्डनकडे येणार्‍या रस्त्यावर अशा जवळपास 100 वर अतिक्रमणे आहेत. तसेच शाहू नगर ते पिंप्राळा गेटकडे जाणार्‍या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. हळुहळू ही कारवाई मशीदीपयर्र्त नेण्यात येणार आहे.  यात बहुतेक नागरिकांनी गटारींवर ढापे केले आहेत, शौचालय उभारले आहेत, यापैकी 57 अतिक्रमणांवर मनपाने हतोडा मारला कारवाई बुधवारीही सुरू राहणार आहे.

महापौर, अधिकारी यांचीही उपस्थिती

दरम्यान शाहू नगर परिसरात सकाळी 10 ते 10.30 पासून कारवाईस सुरूवात झाली. या कारवाईची वार्ता शहरात पसरताच एकच गर्दी या परिसरात होवू लागली. विशेष म्हणजे हा संवेदनशील एरिया आहे. यावेळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. यावेळी महापौर सीमा भोळे, आमदार राजुमामा भोळे, अतिक्रमण विभागाचे एच.एम.खान, आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील, लाईट विभागाचे सुशील साळुंखे, वाहन विभागाचे भोळे, पाणीपुरवठा विभागाचे डी.एस.खडके आदींसह नगररचना विभागातील अभियंता व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. छोटे छोटे गल्लीबोळातही अतिक्रमण असल्याने या सर्व परिसरात बंदोबस्तातच ही कारवाई होईल. या परिसरातूनच तक्रारी येत होत्या. त्या तक्रारीवरुनच ही कारवाई करण्यात येत आहे.

सहकार्य करावे- आ.भोळे

ा शाहू नगर परिसरात अनेक रहिवाशांनी अतिक्रमण करुन घेतले आहे. घराच्या बाहेर जिना उभारला आहे, शौचालये, ओट्याचे बांधकाम केले आहे, गटारीवर ढापे टाकून गटारींचे पाणी थांबवले. यामुळे हे पाणी नेहमी रस्त्यांवर साचून राहते. डासांचा प्रादुर्भाव व इतर रोगराईला यामुळे आयते निमंत्रण मिळते, यामुळे नागरिकांनी अतिक्रमण कारवाई प्रसंगी योग्य ते सहकार्य करावे व हा परिसर मोकळा ठेवावा असे आमदारांनी सांगितले.

चोख पोलीस बंदोबस्त

ा संवेदनशील एरिया असल्याने यावेळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. एक पीएसआय, पाच पोलिस कॉस्टेबल, पाच लेडीज कॉस्टेबल यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कारवाई बुधवारीही सुरूच राहणार असून या परिसरात आता फक्त उभ्या गल्लीबोळात अतिक्रमण काढण्यात येत आहे. नंतर छोट्या गल्लीबोळातही कारवाई करण्यात येईल.

 

 

 

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!