पाऊस

0

म्हणतात ना पाण्याला रंग नसतो. खरयं ते. खरं तर रंग पावसाला असतो. काय गंमत आहे ना, पाऊस पडायला लागला की, कवीताच सुचतात. हातातली सगळी कामे बाजुला टाकून मस्तपैकी पावसात जाऊन भिजायचं. आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणार्‍या धारा, श्वासामध्ये भरून घ्यायचा सळसळणारा वारा, कानामध्ये साठवून घ्यायचे गडगडणारे मेघ अन् डोळ्यामध्ये भरून घ्यायचे निसर्गातील सौंदर्य.

म्हणतात ना पहिला पाऊस हा आठवणींना उजाळा देणारा असतो. म्हणून कोणी एकांतात बसून पावसाची वाट बघतात, तर कोणी आपल्या कॉलेजच्या मित्र-मैत्रीणींना घेवून पावसात भिजण्याची मजा लुटतात. मुद्दाम छत्री घरी विसरणे, आईने जोरात घरातून आवाज द्यायचा, झालयं का पाऊसात भिजून. घरात येऊन गरम चहा व कांद्याची भजी केलीय खाणार का ? त्या भजीच्या स्वादानेच आत जावे लागायचे पण तरी घरात खिडकीत बसून चहा पीत बाहेरचा पाऊस बघण्याची मजाच वेगळी असायची. आजही मला ती आठवण खूप येते. एकंदर काय तर पहिल्या पावसाची भिजण्याची प्रत्येकाची आठवणच वेगळी असते. कधी तो सुखद असतो तर कधी ता दुख:द असतो. सुखद असो वा दुखद जातांना मात्र तो सर्वांना आठवणींचा मोठा खजिना देवून जातो हे निश्चित……

‘पाऊस’ हा शब्दच मनाला भावून जातो आणि जसजशा पावसाच्या रिमझीम सरी पडायला लागतात तेव्हा मन तृप्त होते. दरवर्षी येणारा पहिला पाऊस प्रत्येकालाच अनुभवायला मिळत असतो. वैशाख सुरू झाला की वणव्यासारख्या ज्वालांचा कडकडीत उन्हाळा, हैराण झालेली माणसे, तापलेली धरती जणू काही वाट त्याची आतुरतेने बघतच असतात. कधी एकदा काळे ढग भरून येतात आणि पावसांच्या सरींनी ही सृष्टी पुन्हा एकदा बहरते. असे होऊन जाते. रविवारचा दिवस सुटीचा निवांत वेळ घालवण्याचा दिवस. घराच्या गॅलरीमध्ये सायंकाळच्या वेळी चहाचा कप घेऊन केव्हा ‘तो येतोय आणि या गरमीपासून सुटका होतेय अश्याच विचारात चहा पीत होती तेवढ्यात ढग भरून आले.

जोराचा वारा सुटला आणि अचानक पांढर्‍या ढगांचे काळे ढग कधी झाले कळलेच नाही. रिमझीम पावसाच्या सरी पडायला सुरूवात झाली. त्या सरींचे थेंब मातीवर पडले की तो मातीचा सुगंध मनाला तृप्त करतो. मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवते. पाऊस पडायला सुरवात झाली की मी घराच्या अंगणात उभी रहायची. कारण मातीचा तो सुगंध मला खुप आवडायचा आणि मी ती माती खायची. या पहिल्या पावसाची वाट पाहणारे फक्त आम्हीच होतो असे नाही. सोबतीला या निसर्गातले बरेच घटक सुध्दा आमच्यात सामील होते. अवकाश होता फक्त ‘त्याच्या’ आगमनाचा चातक ही एव्हाना थकलेला होता. पाऊस, हा सर्वांनाच आवडतो की नाही हे माहिती नाही. परंतू ‘पाऊस’ मला खूप आवडतो. कारण म्हणतात ना पाऊस हा सुखाच्या आणि दु:खाच्या क्षणी सोबतीचा असतो. खुप सार्‍या आठवणी हा पाऊस देतो आणि उलगडतो सुध्दा.

पावसाची वाट चातक जसा आतुरतेने पाहतो तशीच वाट मी पण पाहत असते.कारण पावसाळा माझा आवडता ऋतु. पावसाळलेले आभाळ… हिरवकंच झालेल सभोवताल, वाफाळलेला चहा, आठवणीतले मित्र-मैत्रीणीसोबतच्या मनसोक्त गप्पा. आणि त्यात चिंब भिजलेलं मन… स्वत:ला स्वत:शी नव्याने भेटवणारा एक सुंदर क्षणांचा एक मनमोहक प्रवास म्हणजेच उन्हाळ्यानंतरचा येणारा पहिला पाऊस.

तना मनाला अलगद भीजवणारा पहिला पाऊस. खूप आनंदीत करून टाकतो आणि प्रफुल्लतही. आतुरतेने वाट पाहणारा पहिला पाऊस सहज येऊन कधी निघून जातो कळतच नाही. पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबानं सगळ जग एकवटून येत. मनामध्ये असणारी रडगाडी वाहून नेतो. नवीन सुरांमध्ये गीत गात पहिल्या पावसाच्या प्रत्येक थेंबात तेच पाणी, पावसाची तीच जुनी गाणी पण शब्दावीणा आकाशाची आनंदाची देणी घेणी असतात. मनामधले दाटलेले मळभ जणू काही आभाळाकडे धावत असतात.

आणि नभातील इंद्रधनुष्य परत मनात घर करून बसतात. रिमझीम बरसणार्‍या या पावसाबरोबर दु:ख जणू ओसरत जाते. मातीच्या या सुवासासारख दुसर काहीच नसत. मनाच्या कोपर्‍यातील अत्तराला मन आता फसत नाही. कारण पहिल्या पावसाच्या मातीच्या सुगंधाने मन आता भरून गेलेले असते. खरच किती सुखद आणि सुंदर हा आठवणींचा पहिला पाऊस असतो अशीच एका लेखीकेची कविता मला सांगावशी वाटते.

‘ बरच काही, आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो,
सांडून जातो धुवांधार आसुरलेल, थबकलेल,
बरच काही मोकळ मोकळ करून जातो.’
पाऊस सांगत नाही त्याच्या मनातल
आमच्या आधी पण आपल्या मनातल
सार काही शहाण्यासारख समजुन घेत
हवा तेव्हा हवा तसा आपल्यासाठीच भरून येतो…
निवळरोख पाणी
एक थेंब, दोन थेंब, आभाळभर रांगच रांग
पुन्हा थेंब, त्यातच पाऊस,
नितळ नितळ करत जातो, बरच काही
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो’

माझ्या अंगणात आज पहिला पाऊस आला. मोगरा कोमजलेला होता. आज कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती. सोनेरी प्रकाशात भीजलेली वाटत होती. वळचणीची पांढरी कबुतर मुखी नको करतात अगदी आज त्यांच्या भिजल्या पंखांची थरथर पाहतच बसले. मी एकटक झाड मोहरली. पाकळ्या थंड हवेची झुळूक अंगाला मोहरू लागली. मातीचा तो सुगंध जणू काही मनात खुळ्यासारखा उडून गेला. मध्येच अंगाला झोंबणारा गारवा, हलकी रिमझीम, आकाशात अचानक वेगळेच रंग आले, म्हणतात ना पाण्याला रंग नसतो खरतर मग पावसाला असतो. काय गंमत आहे ना !

पाऊस पडायला लागला की, कविताच सुचतात. हातातली सगळी कामे बाजुला टाकून मस्तपैकी पावसात जाऊन भिजायच. आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणार्‍या धारा, श्वासामध्ये भरून घ्यायचा. सळसळणारा वारा, कानामध्ये साठवून घ्यायचे. गडगडणारे मेघ डोळ्यामध्ये भरून घ्यायचे. निसर्गातील सौंदर्य म्हणतात ना पहिला पाऊस हा आठवणींना उजाळा देणारा असतो. म्हणून कोणी एकांतात बसून पावसाची वाट बघतात. तर कोणी आपलया कॉलेजच्या मित्र-मैत्रीणींना घेवून पावसात भीजण्याची मजा लुटतात.

खर सांगू मला, माझ्या मित्र-मैत्रीणी बरोबर पावसात भिजायला खुप आवडायचे. कारण मला आजही आठवते आमच्या गावाकडचा पाऊस. लहाणपणी ना पाऊस पडायला लागला की अंगणात जाऊन मुद्दामून भिजायचे. पावसात भिजता यावे म्हणून मुद्दामुन छत्री घरी विसरणे, आईने जोरात घरातून आवाज द्यायचा ‘झालयं का पाऊसात भिजून’. घरात येऊन गरम चहा व कांद्याची भजी केलीय खाणार का ? मग त्या भज्यांच्या स्वादानेच आत जावे लागायचे. घरात खिडकीत बसून चहा पीत बाहेरचा पाऊस बघण्याची मजाच वेगळी असायची.

आजही मला ती आठवण खूप येते. एकंदर काय तर पहिल्या पावसाची भिजण्याची प्रत्येकाची आठवणच वेगळी असते. ढगांचा तो गडगडाट, वीजांचा कडकडाट आणि कोसळणार्‍या पावसाच्या धारा आणि त्यात चिंब होणारी समस्त जीवसृष्टी. सारे कसे मोहक,चैत्यन्य फुलवणारे. तो येतो कधी रिमझिम तर कधी मुसळधार तर कधी भिजपाऊस तर कधी लागलेली झडी. काहींना दु:खात लोटतो तर काहींना सुखात. दु:ख असो वा सुख प्रत्येकाच्या वाट्याला तो देवून जातो भरपूर आठवणींचा खजिना. नदीनाल्याना पाणी, शेतातील पिकांना जीवदान, तर पुरात घेतले जातात हजारोंचे प्राण, वाहून वाहून तोही थकतो आणि चिर विश्रांतीसाठी तो समुद्र नावाच्या प्रियकरात एकरूप होऊन जातो. एकजीव होऊन जातो. नभान दिलेले हे पाऊस नावाच दान तो सर्वांना वाटत तो समुद्रात विलीन होत असतो. त्यामुळे जो तो त्याल्या आपल्यात साठवण्याचा प्रयत्न करत असतो.तेव्हाच मला गाणे गुणगुणावेसे वाटते. देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ग….

मोनाली लंगरे 

LEAVE A REPLY

*