Type to search

जळगाव फिचर्स

इंडिका कारमध्ये संशयास्पद आढळलेली पंधरा लाखांची रक्कम जप्त

Share

जळगाव –

शहरालगतच्या शिरसोली रस्त्यावर पेट्रोलिंग कामी तैनात असलेल्या पोलिसांना इंडिका कारमध्ये आढळून आलेली पंधरा लाख तेवीस हजार रुपयांची रक्कम एमआयडीसी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, ही रक्कम हवाल्याच्या व्यवहाराची असल्याचा अदांज व्यक्त होत आहे.याबाबत रात्री उशिरापर्यंत खात्री करण्याचे काम सुरु होते.

पोलीस मुख्यालयात नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी नटवर जाधव व वसंत लिंगाये हे शिरसोली रोडवर बेकर मोबाईल पेट्रोलिंग कामी तैनात असताना शिरसोली रस्त्यावरील हॉटेल ग्रेपीजसमोर पंकज रमेश पाटील, जावेद शहाजीर तडवी दोन्ही रा. पिंप्री, ता. पाचोरा हे इंडिका कार क्रमांक एम एच 19 ए ई 2997 ने जळगावकडून शिरसोलीकडे जाताना दिसले.

दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांनी कार थांबवून तपासणी केली असता कारमध्ये तीन बॅगेत पंधरा लाक तेवीस हजार पाचशे रुपयांची रक्कम आढळून आली. दरम्यान, या रकमेबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने व कारची कागदपत्रेदेखील न आढळून आल्याने ही रक्कम दोन्हींही कर्मचार्‍यांनी एमआयडिसी पोलीस ठण्यात जमा करण्यात आली.

दोन्ही तरुणांना विचारपूस केली असता त्यांनी कापसाचे व्यापारी असून आम्ही कापूस गुजरातमधील विक्रमभाई यांना विक्री केला आहे. त्यांनी कापसाची रक्कम शहरातील एका ज्वेलर्स दुकानातून घेण्याचे सांगितल्याने आम्ही तेथून ही रक्कम घेतली व सदरची रक्कम शेतकर्‍यांना कापूस खरेदीच्या बदल्यात देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांना या रकमेबाबत परिपूर्ण खात्री न झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत याबाबतची चाचपणी सुरु होती.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!