Type to search

जळगाव

शहरातील विविध शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबविणार

Share

जळगाव –
येथील बॉक्स ऑफ हेल्प गृपचा दुसर्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी दुपारी दीडला अभियानाचा शुभारंभ होईल. यावेळी शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहतील. वर्धापनदिनानिमित्त प्रत्येक शाळेत रांगोळी स्पर्धा होणार आहे. त्याचे बक्षीस वितरण यावेळी होईल, अशी माहिती बॉक्स ऑफ हेल्प गृपच्या संस्थापिका सुधाताई काबरा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

या शाळांमध्ये अभियान
शहरातील ज्ञान साधना विद्यालय, बाल मोहन शाळा, सरस्वती विद्या मंदिर, शंकुंतला माध्यमिक विद्यालय, चौबे शाळा, ग्राम विकास विद्यालय यासह विविध शाळांमध्ये दि.२० ऑगस्टपासून स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे.

१० कॅरी बॅग आणा वही न्या
प्लास्टीक ही मोठी समस्या आहे. प्लास्टीक मुक्तीसाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी ‘कॅरी बॅग आणा आणि एक दोनशे पेजेस नोटबूूक घेवून जा असा उपक्रम राबवित आहोत.
———-

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!