जागतिक जलदिनानिमित्त शनिवारपासून जलसप्ताह

0
जळगाव । जागतीक जलदिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशन, भवरलाल अ‍ॅन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, नीर फाऊंडेशन, जलश्री आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लितर्फे 16 ते 22 मार्च दरम्यान जलसप्ताह साजरा होणार आहे. 16 रोजी सकाळी 8.30 वा. सिंधी कॉलनीतील जलमंदीरात जलपूजन होईल.

शनिवारी सायंकाळी 6 वाजेपासून भाऊंचे उद्यान येथे विविध कार्यक्रम होतील पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन, नगरदेवळ्याचे शाहीर शिवाजीराव पाटील यांचा पोवाडा, 17 मार्चला चंद्रकांत इंगळे यांचा कार्यक्रम, 18 रोजी सायंकाळी 6.30 ला विद्यार्थी पथनाट्य सादर करतील. 20 रोजी निंबध स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच ऋषिकेश जोशी महाराजांचे 21 रोजी कीर्तन होईल.

22 मार्चला सकाळी 7.30ला महात्मा गांधी उद्यान ते भाऊंचे उद्यान अशी जलदिंडी काढण्यात येईल. सायंकाळी 6.30 वा. बक्षीस वितरण होईल. 19 मार्चला मु. जे. महाविद्यालयाच्या जलश्री विभागातर्फे जनजागृती होईल तर नीर फाऊंडेशनच्या पुढाकारातून का. ऊ. कोल्हे विद्यालयात मानवी साखळीव्दारे भारताचा नकाशा तयार करून त्यात जलबचतीचा संदेश दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*