संत मुक्ताबाई पालखीचे शहरात आगमन

0
जळगाव । दि.2 । प्रतिनिधी-जळगाव ते श्री क्षेत्र पंढरपुर व क्षेत्र पंढरपुर ते जळगाव असा तब्बल 1100 किलोमीटरचा पायी प्रवास करून संत मुक्ताबाई राम पालखीचे आज शहरात आगमन झाले.
श्रीराम मंदिर संस्थानच्या श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूरहून दि.1 रोजी दुपारी मेहरुण परीसरात आगमन झाले. यानिमित्ताने मेहरूण भागातील श्रीराम मंदिरात रात्री अशोक महाराज देवरे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.

आज सकाळी 10 वाजता देवदत्त महाराज मोरदे यांचे कीर्तनानंतर पालखी शहराकडे निघाली. शहरात विविध ठीकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले.

संध्याकाळी सदगुरू अप्पा महाराज समाधी मंदिर येथे आगमन झाल्यावर अप्पा महाराज समाधी येथील पुजारींच्या हस्ते पालखीचे विधीवत पुजन करुन आरती करण्यात आली.

त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाची पंतपदी भजन सेवा देखील पालखीला देण्यात आली. यावेळी गणनाम सत्संग मंडळातर्फे भजनसेवा सादर करण्यातआली.

ही पालखी जून महिन्यात शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान झाली होती. पालखी 1100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आज जळगावात आगमन झाले.

 

LEAVE A REPLY

*