Tuesday, April 23, 2024
Homeजळगावजळगाव : संचारबंदीचे उल्लंघन केल्याने पोलीस कारवाई

जळगाव : संचारबंदीचे उल्लंघन केल्याने पोलीस कारवाई

जळगाव | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन, संचारबंदी सुरू आहे. परंतु, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत ईच्छादेवी चौक परिसरातील रस्त्यावर तोंंडावर मास्क न लावता व दुचाकीवर फिरणार्‍या २२ वर्षीय तरुणीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी संचारबंदीचे आदेश दिल्यानंतरही विनाकारण रस्त्यावर दुचाकीने फिरुन अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर इच्छादेवी चौकात गुरुवारी सकाळी ११.३० वाजता एक तरुणी तोंडावर मास्क न लावता दुचाकीवरून जात होती.

या तरुणीला महिला पोलीस कर्मचार्‍यांनी चौकशीसाठी थांबविले असताना तिने बाहेर निघण्याचे समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे तिच्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षण रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, महिला कॉन्स्टेबल मालती वाडीले, आशा सोनवणे यांनी केली. याबाबत कॉ.मंगला तायडे यांनी फिर्याद दिल्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या