‘त्या’ चिमुकलीवर वडिलांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

0
जळगाव । समतानगरातील त्या 9 वर्षीय चिमुकलीवर तिच्या वडीलांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान कुटुंबियांसह नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली होती.

शहरातील समता नगरातील धामणगाव वाड्यात राहणार्‍या 9 वर्षीय चिमुकलीवर दुष्कर्म करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना काल दि.13 रोजी सकाळी उघडकीस आली होती. दरम्यान या चिमुकलीचे वडील खुनाच्या गुन्ह्यात अमरावती येथील कारागृहात असल्याने अंत्यसंस्कारासाठी त्यांना सुट्टी देण्यात आली होती. रात्री 7.30 वाजता चिमुकलीचे वडील जिल्हा रुग्णालयात आले.

त्यानंतर चिमुकलीचा मृतदेह घरी नेण्यात आला. यावेळी कुटुंबियांसह नातेवाईकांनी घरी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर रात्री 8.15 वाजेच्या सुमारास चिमुकलीचा मृतदेह दफन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.9 वर्षीय चिमुकलीवर दुष्कर्म करून तिची हत्या करून तिच्या मृतदेह गोणपाटात फेकण्यात आला होता. मृतदेह अर्धानग्नावस्थेत असल्याने चिमुकलीवर दुष्कर्म झाले असल्याचे प्रथमदर्शीनी दिसून आले होते.

चिमुकलीच्या वडीलांना कारागृहातून अंत्यसंस्कारासाठी सुट्टी
चिमुकलीचे वडील खुनाच्या गुन्ह्यात अमरावती येथील कारागृहात होते. चिमुकलीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना आज दुपारी सुट्टी देण्यात आली. त्यानंतर चिमुकलीचे वडील सायंकाळी 7.30 वाजता रेल्वेने पोलिस बंदोबस्तात जळगावी आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात महापौर ललीत कोल्हे, माजी उपमहापौर सुनिल महाजन, माजी नगरसेवक शिवचरण ढंढोरे, अरुण चांगरे यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.

चिमुकलीचा मृतदेह पाहताच वडीलांना फोडला हंबरडा
जिल्हा रुग्णालयात चिमुकलीचा शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला होता. चिमुकलीचे वडील आल्यानंतर त्यांनी शवविच्छेदनगृहात चिमुकलीचा चेहरा पाहताच हंबरडा फोडून आक्रोश केला. त्यानंतर मृतदेह समता नगरात नेण्यात आला. त्यानंतर मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबिय व नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर दफनविधी करून मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले.

LEAVE A REPLY

*