समृध्द जीवन गृपमधील गुंतवणुकदारांची हक्कासाठी मुक मोर्चातून वज्रमुठ !

0
जळगाव । दि.22। प्रतिनिधी-समृध्द जीवन गृपमधील गुंतवणुकदारांचा मुक मोर्चा निघाला. मोर्चामध्ये सहभागी महिलांनी आमची गुंतवणुक मिळालीच पाहिजे, आमची एकजुट पैसे मिळवल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे असे फलक हाती घेवुन आपल्या हक्कांसाठी वज्रमुठ आवळली.
मोर्चानंतर जिल्हाधिकार्‍यांची शिष्टमंडळाने भेट घेवुन कंपनीची चौकशी मागणी केली.
प्रोगेसिव्ह वेलफेअर असोसिएशनतर्फे समृध्द जीवन फुडस इं.लिमिटेड या कंपनीतील गुंतवणुकदारांचा मुक मोर्चा काढण्यात आला. मुक मोर्चाची सुरवात बी.जे.मार्केट येथुन झाली.

यावेळी पुणे येथील धनेश पाटील, महेश शेलार, विश्वास पगारे, जळगावचे सुनिल काकडे, अरुण महाजन, संतोष पाटील, सुनिल पाटील, सुनिल महाजन, विवेक चौधरी, प्रदीप वाणी, नंदलाल पारधी, जिल्हाध्यक्ष जगतसिंग राजपुत यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा चित्रा चौक, टॉवर चौक, नेहरु चौक, कोर्ट चौक, नवीन बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाला.

मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाला. मोर्चामध्ये सुमारे 300 च्यावर गुंतवणुकदारांनी सहभाग नोंदविला. मोर्चानंतर पुणे येथील धनेश पाटील, जिल्हाध्यक्ष जगतसिंग राजपुत यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवुन निवेदन दिले.

फलकांनी वेधले लक्ष
समृध्द जीवन गुंतवणुकदारांनी काढलेला मुक मोर्चामध्ये महिलांनी मागण्यांचे फलक हाती घेतले होते. त्यात मॅनेजमेंट तुपाशी कस्टमर उपाशी, समृध्द जीवनगृपच्या गुंतवणुकदारांचा हक्कासाठी संघर्ष, आमची गुंतवणुक मिळालीच पाहिजे, आश्वासन नको पुर्तता व्हावी, आमची एकजुट पैसे मिळवल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, समृध्द जीवन ने केले लोकांचे जीवन बरबाद, एक कंपनी बंद दुसरी कंपनी चालु, गुंतवणुकदारांचे कष्टांचे पैसे मिळालेच पाहिजे अश्या घोषवाक्याचे फलकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधुन घेतले होते.

अश्या आहेत मागण्या
समृध्द जीवन फुडस इंडिया लिमेटेड ग्रृपची संपुर्ण चौकशी करण्यात यावी, सेबीने दिलेले आदेशाची पुर्तता व्हावी, ज्या संशयीत आरोपींची दोषारोपपत्रात नाव आहे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात यावी, समुध्द जीवन फुडस् इंडिया लिमीटेडच्या ज्या मिळकती सिल केलेल्या आहेत तसेच जे खाते सिल केलेले आहेत त्या मिळकतींची विक्री व समुध्दीच्या खात्यातील रक्कम गुंतवणुकदारांना परत करण्यात यावी, समुध्द जीवन फुडस इंडियाची जी कार्यालये सुरु आहेत ती बंद करण्यात यावी व गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावे अश्या मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकार्‍यांना प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनच्या सभासदांनी दिले.

 

 

LEAVE A REPLY

*