Type to search

Featured जळगाव

video जळगाव : सखी घे भरारी या ग्रुप द्वारा ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’ उपक्रमाला प्रतिसाद

Share

जळगाव –

‘सखी घे भरारी’ तर्फे रविवार दि. 5 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगाव येथे ‘चालत रहा, धावत रहा, तुमच्या स्वास्थ्यासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिलांसाठी चालण्याची, धावण्याची तसेच दोरीवरच्या उड्यांची स्पर्धा घेण्यात आली.

प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधिक्षक भाग्यश्री नवटक्के आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रेखा पाटील तसेच कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी निर्भया पथकाच्या अध्यक्ष मंजु तिवारी उपस्थित होत्या.

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आहे. भाग्यश्री नवटक्के या आपल्या भाषणात म्हणाल्या की, ‘स्त्रीने आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे,  संध्याकाळी 2 तास सहजच व्हाट्सअप बघण्यात जातात त्याऐवजी पुस्तके वाचा. त्यामुळे संपूर्ण परिवाराला एक चांगली सवय लागेल.’

निर्भया पथकाच्या प्रमुख मंजु तिवारी म्हणाल्या की, महिलांनी भारतीय संस्कृती जपावी. मुलांनी घरातील तसेच समाजातील स्रियांचा सम्मान करावा.

सेल्फी पॉईंटचे आकर्षण

सेल्फी पॉईंटवर ‘स्रीचे आरोग्य परिवाराचे महतभाग्य’ तुळस लावा ऑक्सिजन मिळवा, आधी विद्यादान मग कन्यादान यासारखे स्लोगन लावण्यात आले होते.

ज्यांनी उंच झेप घेऊन गगनचुंबी भरारी मारली त्या यशाच्या मानकरी ठरल्या आहेत. यात –

धावणे स्पर्धा- 1 ला  गट- सौ.दिपाली पाटील प्रथम, आयेशा खान द्वितीय 2 रा गट- डॉ.रुपाली बेंडाळे प्रथम, डॉ.मेघना नारखेडे द्वितीय सौ.नैनश्री चौधरी तृतीय 3 रा गट- सौ.विद्या बेंडाळे.

चालणे – 1 ला  गट-  1 डॉ.विद्या पाटील, 2 सौ.शोभा राणे 3 सौ नीता वराडे, 4 नलिनी चौधरी,  5 सौ  सिंधु भारंबे.

दोरी उड्या- 1- सौ दिपाली पाटील, 2 -भारती पाटील, 3- नयना सचिन चौधरी,  शशिकला बोरोले यांनी 70व्या वर्षी स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण केल्यामुळे   विशेष बक्षिस देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जयंती पराग चौधरी,  अ‍ॅड. भारती वसंत ढाके,  डॉ.निलम विनोद किनगे, सौ.भारती सचिन चौधरी, डॉ.स्मिता पाटील, सौ.सोनाली पाटील,  सौ.दिपाली पाटील, सौ.कांचन राणे, सौ.वनिता चौधरी, सौ.वैशाली कोळंबे, सौ.उषा राणे, सौ.संगीता रोटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.संध्या अट्रावलकर यांनी केले.

सखी घे भरारी ग्रुपच्या आयोजकांचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले. या स्पर्धेसाठी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण सोनवणे आणि गणेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेत सर्व वयोगटातील तसेच  सर्वच क्षेत्रातील अ‍ॅड.सुजल भोसले, अ‍ॅड.कल्पना लोखंडे, डॉ.एकता चौधरी, सौ.रजनी पाटील, सौ.शीतल भैया अश्या सुमारे 115 महिलांनी सहभाग नोंदविला आहे. त्यात 18 वर्षांच्या तरुणींपासुन 70 वर्षीच्या आजींपर्यंत सर्वांनी तसेच सहभाग नोंदविला होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!