Friday, May 3, 2024
Homeजळगावलालपरीची गगनभरारी ; कर्मचार्‍यांची उत्तम कामगिरी

लालपरीची गगनभरारी ; कर्मचार्‍यांची उत्तम कामगिरी

रवींद्र पाटील – Jalgaon – जळगाव :

जळगाव विभागाची मालवाहतूक बससेवा ही राज्यातच नव्हे तर देशभरात मालवाहतूकीत अव्वल ठरु पाहत आहे. नुकतेच…

- Advertisement -

जळगाव विभागाने तिरुपती बालाजीला तब्बल 16 मालवाहतूक बसेस रवाना करीत आंतरराज्य माल वाहतूकीत ठसा उमटविला आहे.

आजच्या स्थितीत मालवाहतुकीत स्वत:ला अव्वलनंबर सिद्ध केले आहे. आजअखेर तब्बल 13 हजाराच्या पुढे करुन 90 लाखाच्या वर उत्पन्नाला गवसणी घातली असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी श्री. बंजारा, श्री. सुरेश महाजन यांनी दिली. राज्यभरात एसटीद्वारे मालवाहतुकीची सेवा ही 28 मे पासून सुरू करण्यात आली होती.

साडे तीन महिन्यातच मालवाहतुकीतही जळगाव विभाग आगाराने उत्तुंग भरारी घेतली आहे. राज्यात अव्वल स्थान तर पटकावले आहेच. मात्र राज्यातील इतर आगारांचे उत्पन्न हे 50 लाखापेक्षाही कमी किंवा त्याच्या आसपास आहे.

उत्पन्नाच्या बाबतीत फक्त एकटा जळगाव विभाग हा 90 लाखावर पोहोचला आहे. यात जळगाव विभागातील 11 आगारांचा समावेश आहे. सवार्र्चे सहकार्य आहे. सव्वा तीन ते साडेतीन महिन्यातच प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीत गगनभरारी घेतली आहे. तब्बल 13 हजाराच्या पुढे फेर्‍यांद्वारे 90 लाखावर उत्पन्न जळगाव विभागाने मिळविले आहे.

या विभागाच्या आसपास कुठल्याही विभागाची कामगिरी पोहोचलेली नाही. किंबहुना देशभरातही ही कामगिरी अव्वल ठरु शकते. जळगाव विभागाच्या या कामगिरीत जळगाव विभागाचे वाहतूक नियंत्रक राजेंद्र देवरे, वाहतूक अधिकारी श्री. बंजारा, सुरेश महाजन यांचे सुयोग्य नियोजनाने हे शक्य झाले आहे.

35 टक्के प्रवासी वाहतूक पूर्वपदावर

जळगाव आगारातून आजअखेरीस 30 बसेस सोडण्यात येत आहेत. तर दिवसभरात आगारात 128 बसफेर्‍या होत आहेत. विविध आगारातून बाहेरुन येणार्‍या बसेसच्या संख्येतही वाढ होवू लागली आहे. 20 ऑगस्ट रोजी राज्य परिवहनाच्या प्रवासी वाहतुकीच्या बसफेर्‍या सुरू झाल्या होत्या. प्रारंभी 2 बसेस आगारातून सुटल्या होत्या. तीन आठवड्यात आजअखेर त्यांची संख्या 30 वर गेली आहे. तर बाहेरील विविध आगारातून प्रारंभीच्या दोनचार दिवसात मोजून 10 च्या वर फेर्‍या होत नव्हत्या. या बसफेर्‍या आजच्या स्थितीत सव्वाशेच्या वर गेल्या आहेत. तसेच प्रारंभी 25 ते 30 रुपये उत्पन्न होते. आजच्या स्थितीत 2 लाखावर उत्पन्नाचा आकडा प्रवासी वाहतुकीत पोहोचला आहे.

जळगाव बसस्थानकात प्रवाशांसह बसफेर्‍यांमध्ये वाढ

दिवसेंदिवस प्रवासी संख्येतही वाढ होवू लागली आहे. बससेवा सुरू झाल्यानंतर प्रारंभी कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक बाहेर निघणे टाळत होते. मात्र नंतर लांब पल्ल्याच्या बसेस सुरू झाल्यानंतर प्रवासीही बसस्थानकात वाढू लागले.

प्रवाशांच्या मागणीनुसार बसफेर्‍या वाढू लागल्या. मागणीनुसार बसफेर्‍या सोडण्याचे नियोजन आगार प्रमुख प्रज्ञेश बोरसे, निलेश पाटील यांनी केले होते. यात वाढ होत आजअखेर 30 बसेस विविध ठिकाणी आगारातून जात आहेत. बाहेरील आगाराच्या फेर्‍याही वाढल्या आहेत. 2 सप्टेंबरला आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली, ई पास सेवा बंद झाल्याने याचा फायदा बससेवेला मिळाला. परिणामी प्रवासी अधिक संख्येने वाढू लागले आहेत.

जळगाव बसस्थानकात दिवसभर प्रवासी दिसू लागले आहेत. सायंकाळी 6.30 पयर्र्त एसटी बससेवा सुरू असते अशीही माहिती आगार प्रमुख निलेश पाटील यांनी दिली. प्रवासी सेवा वाढावी याकामी वाहतूक निरीक्षक नीलिमा बागूल यांचे अनुभव तसेच विभागीय वाहतूक निरीक्षक राजेंद्र देवरे यांचे सूक्ष्म नियोजन असते. आगार प्रमुख प्रज्ञेश बोसे हेही सतत प्रयत्नात असतात.

तिरुपती बालाजीला 16 मालवाहतूक बसेस रवाना

जळगाव विभागातून 6 सप्टेंबर रोजी 16 बसेस आंतरराज्य माल वाहतूकीत ठसा उमटवत निघाल्या. विभागातील सर्व आगारातील लालपरीचे रा प चालक 32, 2 यांत्रिक, व 2 वाहतुक नियंत्रक श्री तिरूपती बालाजी करीता 16 मालवाहतूक ट्रक घेवून निघाल्या. शासकीय साहित्य, कागदपत्रे, निवडणुक कामी वापरले जाणारे साहित्य, मतदान यंत्रे आदींची वाहतूक या बसेसद्वारे करण्यात आली. या कामी विभाग नियंत्रक देवरेसर , यंत्र अभियंता श्री सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी बंजारा ,विभागीय भांडार अधिकारी श्री राखुडेसर व वाहतूक शाखा सर्व पर्यवेक्षक यांचे मार्गदर्शन व जळगाव विभागातील सर्व आगार व्यवस्थापक, सहा. वाहं. अधिक्षक , स. वा. नि. , आगार सहा. कार्य. अधिक्षक व मालट्रक वाहतूक व्यवस्था,यांत्रिक यांनी विशेष परीश्रम करीत जळगाव जिल्हयाचा झेंडा उंच केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या