मद्यपी बसचालकाची विभाग नियंत्रकासह अधिकार्‍यांना शिवीगाळ

0
जळगाव । दि.2 । प्रतिनिधी-चाळीसगाव आगारात बदली केल्याचा राग आल्याने मद्यपी बसचालकाने विभागनियंत्रकासह अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी यांना शिवीगाळ कार्यालयात दुपारी 2 वाजेच्या गोंधळ घातला.
याप्रकरणी जिल्हापेठ पोेलिसात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून धमकी दिल्याप्रकरणी बसचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बसचालक करणसिंग हरसिंग पाटील हे अनेक दिवसांपासून निलंबीत होते. विनंतीवरुन त्यांना हजर करण्यात येवून त्यांची चाळीसगाव आगारात बदली करण्यात आली.

कार्यालयातील लिपीक दिपक वाडेकर यांनी दिलेला कार्यालयीन आदेश न स्विकारता बसचालक करणसिंग पाटील यांनी दारुच्या नशेत लिपीक यांच्या कार्यालयात येवून आरडाओरड करून विभागनियंत्रक चेतना खिरवाडकर यांच्यासह विभागातील अधिकारी व विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांना शिवीगाळ करून माझी चाळीसगाव आगाराला झालेली नेमणुक रद्द न केल्यास आत्मदहन करेल असे सांगून कार्यालयात गोंधळ घातला.

यावेळी कौतुक बागुल, सुरेश महाजन, संजय सुर्यवंशी, प्रशांत महाजन, राहुल शिरसाठ, विनोद शितोळे, भरत मोरे यांनी बसचालकाची समजुत घालण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर याबाबत जिल्हापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी विभागनियंत्रक यांच्या कार्यालयात येवून करणसिंग पाटील यांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी लिपीक रहेमान सिंकदर तडवी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी बसचालक करणसिंग पाटील यांची वैद्यकीय तपासणी करून ताब्यात घेतले.

यापुर्वीही घातला होता गोंधळ
बसचालक करणसिंग पाटील यांनी यापुर्वी देखील आगाराच्या आवारात गोंधळ घातला असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी पाटील यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती.

 

 

LEAVE A REPLY

*