कर्जमाफीची आकडेवारी फसवी

0
जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची मर्यादा दीड लाखापर्यंत केल्याची घोषणा केली. मात्र त्यांनी सादर केलेली आकडेवारी ही फसवी असल्याचा आरोप सुकाणी समिती सदस्य एस.बी. पाटील यांनी केला आहे.
राज्य सरकारने पीककर्ज आणि मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेश असलेल्या राज्यातील सुमारे 40 लाख शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याच्या दृष्टीने दीड लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण देशातील राज्याच्या स्थितीची आकडेवारी सादर केली. या आकडेवारीमध्ये राज्यातील शेतकर्‍यांची पत पुरवठा प्रति कुटुंब 54 हजार असल्याचे देखील सांगितले.

यावरुन शासनाने देशात सर्वात कमी पतपुरवठा असल्याचे मान्य केल्याचे सांगत एस.बी. पाटील यांनी शेतकर्‍याला शासनाकडून पुर्ण पतपुरवठा नसल्याने त्याला खाजगी व सावकारी कर्ज घ्यावे लागते.

यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेतकर्‍यांचा पतपुरवठा वाढविण्याची मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सादर केलेली आकडेवारी ही फसवी असून 2012 च्या दुष्काळातील शेतकर्‍यांना तसेच नियमित कर्ज भरणार्‍यांना देखील व्याज बँकांनी माफ केले नसल्याचेही एस.बी. पाटील म्हणाले.

खर्‍या अर्थाने सातबारा कोरा करण्याची अपेक्षा होती. मात्र या अपेक्षेचा भंग झाला आहे. तसेच शेतमालाला हमी भाव व वीज बिलासह इतर मागणयांचा विचारही मुख्यमंत्र्यांनी केलेला दिसत नाही, असाही आरोप एस.बी. पाटील यांनी केला.

 

LEAVE A REPLY

*