Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव राजकीय

जळगाव : शेतकरी कष्टकर्‍यांचे दुःख जाणून घ्या, कारणे सांगू नका : प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर

Share

जळगाव –

 

लोकसभा व विधानसभा निवडणूकांनंतर तसेच आगामी काळातील जिल्हा परीषदांच्या निवडणूकांच्या संदर्भात पक्ष बांधणी व पदाधिकारी, कार्यकत्यांची महिला आघाडी परीवर्तन करू शकते. पक्ष मदत करत नाही, पदाधिकारी सहकार्य करीत नाहीत अशी कारणे सांगू नका, नविन सदस्यांना देखिल महत्वाच्या जबाबदार्‍या द्या, ज्यांना तीन वर्षे अथवा अधिक कार्यकाळ विद्यमान पदावर आहेत त्यांनी दुसर्‍यांना संधी देउन मार्गदर्शनाचे कार्य करा.

यावर्षी अतीपावसामुळे शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी कष्टकर्‍यांचे दुःख समजून घेण्यासाठी बांधावर जा त्यांच्या व्यथा वेदना जाणून, पंचनाम्यांची स्थिती काय आहे, दाद कोणाकडे मागायची याचे मार्गदर्शन करा, तर २००९ मधे जिल्हयात ५ आमदार व सहयोगी पक्षाचे आमदार होते तशी परीस्थीती बदलू शकते असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात महिला पदाधिकार्‍यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि, भाजपाच्या मंत्री गिरीष महाजन यांनी विरोधी पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही असे आव्हान दिले होते. तरी पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर यावर्षी जिल्हयात राष्ट्रवादी, सहयोगी पक्ष, व अन्य १ अशा तीन जागा मिळवित ते खोटे ठरविले आहे. तसेच महिला सक्षमीकरण, सुरक्षा, बचत गट यांविषयी मार्गदर्शन करून पक्षसंघटन बळकटीकरणावर भर द्या असे रूपाली चाकणकर यांनी महिला पदाधिकार्‍यांशी मार्गदर्शन करताना सांगीतले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!