आरटीओ कार्यालयात यापुढेही एजंटला ‘नो एंट्री’च

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-उपप्रादेशिक परिवहन विभागात एका मद्यधुंद दलालाकडून परिवहन अधिकारी यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याचा प्रकार दि.16 रोजी घडला होता.
त्या दिवसापासून आरटीओ कार्यालयात दलालांना प्रवेशबंदी करण्यात आली असल्याने तीन दिवसांपासून सर्व दलाल कार्यालयाच्या गेट बाहेर आहे.
दरम्यान आज सर्व एजंटच्या बैठकीत परिवहन अधिकारी यांनी एजंट यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देवून यापुढेही एजंट यांना कार्यालयात नो-एंट्रीच असल्याचे सांगितले.

आरटीओ कार्यालयाबाहेर सर्व एजंट यांनी आज परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत परिवहन अधिकारी यांनी सर्व एजंट यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला.

तसेच सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे यापुढे एजंट लोकांना कार्यालयाच्या आवारात नो-एंट्रीच राहणार असल्याचे सांगितले.

तसेच शोरूमच्या प्रतिनिधींना वाहनांचे टॅक्स भरण्यासाठीच एन्ट्री देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

अनेकांची कामे रखडली
आरटीओ कार्यालयात एजंट यांना नो-एंट्री करण्यात आली असून अनेकांनी एजंटकडे दिलेली कामे सध्या रखडली असल्याने नागरिकांची देखील फजिती होत आहे. तसेच ऑनलाईन प्रणालीचे काम संथ गतीने होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

LEAVE A REPLY

*