LOADING

Type to search

आरएसएसला पन्नास तोंडे

maharashtra जळगाव राजकीय

आरएसएसला पन्नास तोंडे

Share
जळगाव । केवळ हिंदू राष्ट्र बनवायचे आहेत असे स्वप्न दाखवून हे त्याच धुंदीत आहेत, त्यामुळे त्यांना कसलीही गोष्ट समजत नसून ते कोणत्याही मार्गे तुमच्यापर्यंत पोहचतील, असे सांगत रावणाला दहा तोंडे होती, त्याप्रमाणे आरएसएसला पन्नास तोंडे असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ता सेलचे सरचिटणीस विकास लवांडे यांनी गुरूवारी येथे केला. जळगाव लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी कार्यालयात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी या कार्यशाळेत माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील, काँग्रेससचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफार मलीक, कार्याध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे खान्देशचे प्रवक्ते योगेश देसले, अनिल भाईदास पाटील, खलील देशमुख, महानगराध्यक्ष नामेदवराव चौधरी, रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा समन्वयक विलास पवार, सेवादलचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, महानगराध्यक्ष युवक अध्यक्ष अभिषेक पाटील, कॉग्रेस आयचे सरचिटणीस अजाबराव पाटील, कॉग्रेसचे उपाध्यक्ष सचिन सोमवंशी, प्रमोद पाटील, विजयाताई पाटील, मंगलाताई पाटील, मिनल पाटील, प्रतिभा शिरसाट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आयचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रश्न समजून उत्तरे द्यायला भाग पाडा; पदाधिकार्‍यांना आवाहन
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनूस्मृती, राज्यघटनेचा लढा समजून घ्यावा, जोपर्यंत हा लढा आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपली तलवार म्यानच राहते. आपण केवळ प्रश्न विचारू नये तर उत्तरे द्यायला भाग पाडलं पाहिजे. असे लवांडे यावेळी म्हणाले. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून कधी संस्कृती रक्षणाचा दाखला देत कधी गौरक्षणाच्या नावाखाली हे तुमच्या पर्यंत पोहचली. आरएसएसला पन्नासच नाही तर शंभर तोंडही असतील मात्र आपलीच माणसं त्यांच्या जाळ्यात अडकतात. आता निवडणुका लागल्या आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जातात. एखादा बुद्धीभेदाचा मॅसेज टाकला जातो आणि आपले कार्यकार्यर्ते त्याला बळी पडून स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाचा ठरावा करतात, असे त्यांनी यावेळी सांगितले. ही कार्यशाळा तात्पुरत्या स्वरूपाची नसून ती कायमस्वरूपी उपयोगी पडणारी गोष्ट आहे. या कार्यशाळेत मोदींची हिटरलशी तुलना झाली म्हणजे तुम्ही समजून घ्या प्रश्न कसे आहेत, असेही ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!