Type to search

maharashtra जळगाव

दुचाकी चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; चार दुचाकी हस्तगत

Share
जळगाव । औरंगाबाद सिडको, बिडकीन, जामनेर, शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दुचाकी चोरणार्‍या तिन्ही अट्टल चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांच्या शोधात होते. दरम्यान जामनेर येथील श्रीराम पेठ भागात राकेश समाधान लोणारी या तरुणाकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी शरिफ काझी, युनूस शेख, सुरज पाटील यांना मिळाली. त्या अनुशंगाने राकेश समाधान लोणारी याने चेतन ईश्वर संग्रामे रा. जामनेर ह.मु. शिरपूर, सागर शिवराम शिरसाठ रा. कल्याण नगर, बिडकीन ता. पैठण या दोघांच्या मदतीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश जानकर, पोलीस उपनिरिक्षक सुधीर लहारे, पोहेकॉ शरिफ काझी, युनुस शेख, सुरज पाटील, प्रकाश महाजन, विकास वाघ, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, गफुर तडवी, दर्शन ढाकणे, इद्रीश पठाण यांनी चेतन ईश्वर संग्रामे व सागर शिवराम शिरसाठ या दोघांना ताब्यात घेतले. या तिघांच्या ताब्यातून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. या चार मोटारसायकली जामनेर, औरंगाबाद सिडको, बिडकीन व शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!