Type to search

सुयोग कॉलनीतील अपार्टमेंटमधील घरातून 65 हजारांचा ऐवज लांबविला

maharashtra जळगाव

सुयोग कॉलनीतील अपार्टमेंटमधील घरातून 65 हजारांचा ऐवज लांबविला

Share
जळगाव । शहरातील मूजे महाविद्यालय परिसरात असलेल्या सुयोग कॉलनीतील आदिती अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

आदिती अपार्टमेंटमधील दुसर्‍या मजल्यावर गणेश वराडे यांचे घर आहे. वराडे कुटूंबिय गेल्या चार दिवसांपासून पुणे येथे नातेवाईकांकडे गेले असल्याने वराडे यांचे घर बंद होते. दरम्यान चोरट्यांनी सोमवारी रात्री या अपार्टमेंटमधील सात घरांच्या कड्या बाहेरुन लावून वराडे यांच्या घराचे कुलुप तोडले. कपाटातील सोन्या, चांदीच्या दांगिण्यांसह 15 हजारांची रोख असा जवळपास 65 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवून नेला.

मंगळवारी सकाळी वराडे यांच्या घराच्या वरील मजल्यावर राहत असलेल्या महिलेने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतू दरवाजा बंद असल्याने त्यांनी रस्त्यांवरुन जाणार्‍या एका तरुणाला अपार्टमेंटमध्ये बोलावून दरवाजाची कडी उघडण्यास सांगितले. महिला घराबाहेर आल्यानंतर तिला सर्वच घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरुन लावलेल्या दिसून आल्या. याचवेळी महिलेला वराडे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसून आल्याने घरात चोरी झाल्याचे समजले.

त्यानंतर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी वराडे यांना फोन करुन चोरीची माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी वराडे कुटूंबिय जळगावात दाखल झाल्यानंतर त्यांनी रामानंद पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावरुन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!