जनरल स्टोअर दुकान फोडून दीड लाखांची रोकड लांबविली

0
जळगाव । शहरातील चित्रा चौकात असलेल्या मनिष प्लाझामधील जनरल स्टोअर्स दुकान फोडून चोरट्यांनी ड्राव्हरमधील दीड लाखांची रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा येथील रहिवाशी असलेले रमेशलाल खुबचंद मदनानी यांचे चित्रा चौकातील मनिष प्लाझामध्ये कमल जनरल स्टोअर्स नावाने दुकान आहे. गुरुवार दि.14 रोजी मदनानी त्यांच्या दुकानातील दीड लाखाची रोकड दुकानात ठेवली. दररोज रात्री ते त्यांच्या दुकानातील रोकड शिरपूर पिपल्स् बँकेत ठेवतात. परंतू कुटुंबिय जळगावी कामासाठी आले असल्याने ते घाईगडबडीत बँकेत भरणा करण्याचे विसरून गेले.

त्यामुळे त्यांनी ड्राव्हरमध्ये दीड लाखाची रोकड ठेवून रात्री दुकान बंद केले. गुरुवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास वॉचमनला कमल जनरल स्टोअर्स दुकानाचे शटर उचकविलेले दिसून आले. वॉचमने याबाबतची माहिती माजी नगरसेवक किशोर भोसले यांना दिली. त्यानंतर भोसले यांनी रमेशलाल मदनानी याना फोन करून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले.

त्यानंतर सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास मदनानी पाचोरा येथून जळगावी आल्यानंतर त्यांना दुकानाचे लॉक तोडून दीड लाखाची रोकड चोरीला गेल्याचे समजून आले. या घटनेबाबत रमेशलाल मदनानी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात भादवी कलम 380 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सफौ. वासुदेव सोनवणे करीत आहे.

LEAVE A REPLY

*