Type to search

जळगाव

रिक्षेत प्रवासादरम्यान वृध्दाचे पाकीट लांबविले

Share

जळगाव । स्वातंत्र्य चौक ते कोर्ट चौक दरम्यान रिक्षेत बसलेल्या इतर प्रवासी तरुणांनी वृध्दाच्या खिश्यातील पाकीटात असलेले 10 हजार 500 रुपये लांबवून नेल्याची घटना दि.17 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी बुधवारी वृध्दाच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील नांद्रा येथील वामन सिताराम पाटील वय 78 हे दि.17 रोजी जळगावात आले होते. स्वातंत्र्य चौकातून ते टॉवर येथे जाण्यासाठी एका रिक्षेत बसले. दरम्यान रिक्षेत अगोदरच तीन तरुण बसलेले होते. त्यांनी स्वातंत्र्य चौक ते कोर्ट चौक दरम्यान रिक्षेत मजाक मस्करी करतांना वृध्दाच्या खिश्यातील पाकीट लांबविले. या पाकीटात 10 हजार 500 रुपये होते. त्यानंतर रिक्षावाल्याने पाटील यांना कोर्ट चौकातच उतरविले. यावेळी खिश्यातील पाकीट चोरीला गेल्याचे समजून आले. त्यानंतर आज बुधवारी सायंकाळी वामन पाटील यांनी जिल्हापेठ पोलीसात फिर्याद दाखल केली असून तपास नापोकॉ. अजित पाटील करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!