सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-कार घेण्यासाठी बनावट शिक्षापत्रिकेची सत्यप्रत देणे निवृत्त पोलीस अधिकार्‍याला चांगलेच महाग पडले. त्याच्याविरुध्द आरटीओ प्रशासनाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव येथील साखरवाडीमधील मातोश्री बाहेती शाळेसमोर राहत असलेले सुरेश देवराम खंबायत हे पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत होते.

खंबायत हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे. सेवानिवृत्तीच्या पैश्यांमधुन त्यांनी होन्डाई कंपनीची कार क्रमांक एम.एच.19 एक्स 0397 ही कार घेतली.

कारच्या नोंदणीसाठी लागणार्‍या कागदपत्रांमध्ये त्यांनी शिक्षापत्रिकेची झेरॉक्स प्रतही दिलेली आहे. दरम्यान उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फेत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

यामध्ये खंबायत यांनी कार नोंदणीसाठी जोडलेल्या कागदपत्रांसोबत असलेली शिक्षापत्रिकेची झेरॉक्स प्रत बनावट निघाली.

यामुळे उप प्रादेशिक अधिकारी चंद्रशेखर शंकराव इंगळे यांच्या फिर्यादीवरुन खंबायत यांच्याविरुध्द कार नोंदणीसाठी बनावट कागदपत्र खरे भासविल्याने फसवणुकीचा गुन्हा रामानंदनगर पोलीसांत दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. अरुण निकुंभ करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*