Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

पोलिस कर्मचाऱ्याची सतर्कता : आत्महत्येच्या प्रयत्नातील महिला बचावली

Share
इगतपुरी : रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू, Latest News Igatpuri One Died Under Train Near Titoli Shiwar

कुटंबातील वादामुळे महिलेचा राग अनावर

जळगाव (प्रतिनिधी) –

– शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील सहाय्यक फौजदार राजेंद्र मोरे यांच्या सतर्कतेमुळे बजरंग पुलाजवळील रेल्वे रुळावर आत्महत्याच्या प्रयत्नातील वयस्कर महिलेचे प्राण बचावले. कौटुंबिक वादातून ही महिला त्रस्त झाली होती. ही घटना २७ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

सहाय्यक फौजदार राजेंद्र मोरे पिंप्राळ्यातील बँक कॉलनीमधील संत मीराबाईनगरात राहतात. सकाळी ते शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात जाण्यासाठी मोटारसायकलवर घरुन निघाले. वाटेतील बजरंग पुलाच्या नवीन बोगद्यातील रस्त्यावरुन बाहेर निघताना त्यांना एक महिला रेल्वे रुळाच्या दिशेने धावत असताना दिसली.

तर दूर अंतरावर तिच्या मागे तिची सून त्या महिलेला रोखण्यासाठी जिवाच्या आकांताने धावत होती. हा प्रकार मोरे यांच्या लक्षात आला. त्यांनी त्यांची मोटारसायकल बाजूला लावली आणि रेल्वे रुळाच्या दिशेने त्या महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली.

धावत पळत जात सदर महिलेल्या अडवले असता ती कोणत्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. हाताला झटका मारुन ती सारखी रेल्वे रुळावर जात होती. परंतु, समोरुन रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या महिलेला रेल्वे रुळाच्या बाजूला खेचले आणि त्याचवेळी तेथून भरधाव रेल्वे गेली.

पोलीस कर्मचार्‍याच्या समयसूचकता, तत्परतेमुळे ही महिला बचावली. अन्यथा अनर्थ घडू शकला असता. हा प्रकार बघून काही अंतरावरील नागरिकही मदतीला धावून आले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!