Type to search

Featured शैक्षणिक

जळगाव : रायपूर येथील मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम प्ले स्कूलमध्ये आर्मी बेसिक ट्रेनींगचे प्रदर्शन

Share
mayurshwar play school

रायपूर, ता.जळगाव

मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम प्ले स्कूल.रायपूर (ता.जळगाव) येथे दि.26 जानेनेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

उपसरपंच प्रविण परदेशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शासन आदेशानुसार ध्वजारोहण करण्यात आधी संविधान उद्देश वाचन करण्यात आले.

यानंतर विविध सांस्कृतीक कार्यक्रम चिमुकल्यांनी सादर केले. यात मुख्य आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी आर्मी बेसिक ट्रेनिंगचे केलेले प्रत्यक्ष प्रदर्शन.  आर्मी बेसिकचे चिमुकल्यांनी आपली कला दाखवत चित्त थरारक प्रात्यक्षीक बघून उपस्थितांनाही थक्क केले.

यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भारती परदेशी, शिक्षक वर्ग शितल चोधरी, माधुरी पाटील, गजेंद्रसिंग परदेशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालकवर्गासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!