Type to search

Featured जळगाव

रावेर : अवैधरित्या केलेला पेट्रोल-रॉकेल साठा जप्त

Share

रावेरतील तिरुपती ऑइल मिल नजिक भोई वाड्यात बुधवारी रात्री राबवण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान एकाकडे अवैधरित्या रॉकेल डिझेल साठा मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशनद्वारा तिरुपती ऑइल मिल परिसरातील भोई वाड्यात रहिवास करणाऱ्या शेख शरीफ शेख मुस्लिम या कडे मोठ्या प्रमाणात रॉकेल व डिझेल मिळून आले असून मालवाहू रिक्षा सह १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून शे. शरीफ यास अटक केली आहे.

त्यांच्या विरुद्ध जीवनाश्यक वस्तू चा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.महाराष्ट्रात रॉकेल बंदी असतांना मिळून आलेला साठा संशयास्पद असून,याबाबत पुढील तपास सपोनि शितलकुमार नाईक करत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!