Type to search

जळगाव

आरक्षण मिळवून गप्प बसू नका, उद्योगात पुढे या- खा.संभाजी राजे भोसले

Share

रावेर । शिवाजी महाराजांनी फक्त मराठ्यांचे स्वराज्य नाही उभे केले, त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांचे स्वराज्य निर्माण केले. पहिले आरक्षण कोणी दिले असेल तर ते 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी, 2007 पासून मराठा आरक्षणासाठी जनजागृती करत आहे. पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाची पायरी चढलो. 57 मोर्चे शांततेत निघल्याने जगभरात मराठा एकीचे कौतुक झाले. मात्र आरक्षण मिळवून गप्प बसून राहू नये उद्योग धंद्यात देखील पुढे यावे, महाराजांच्या स्वराज्याची शान असलेल्या गड किल्याच्या संवर्धनासाठी मोहिमेत सामील व्हावे, असे अवाहन कोल्हापूरचे खा.संभाजी राजे भोसले यांनी रावेरात व्यक्त केले.

येथील मराठा समाज विकास मंडळातर्फे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात 13 देण्गीदारासह 165 विद्यार्थ्यांचा गुण गौरव खा. संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या सुरवातिला छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. यावेळी मजी आमदार अरुण पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, मराठा विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित,प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, जि.प.सदस्या रंजना पाटील, पुणे येथील उद्योजक सुहास महाजन, सोपान पाटील, बाजार समितीचे सभापती डी सी पाटील,शेतकी संघाचे चेअरमन पी आर पाटील, दत्त छाया कन्सट्रक्शनचे राजेंद्र चौधरी, बी एन पाटील, पं.स.सदस्य योगेश पाटील, लक्ष्मण मोपारी, घनश्याम पाटील, वामनराव पाटील, दिलीप पाटील, कडू पाटील, डॉ.एस आर पाटील, यादवराव पाटील, अर्जुन महाजन, युवराज महाजन, डॉ मनोहर पाटील व संचालक यावेळी उपस्थित होते.

प्रास्ताविकातून अध्यक्ष राहुल पंडित यांनी मंडळाच्या वतीने होणार्‍या विविध उपक्रम व समाज मंडळाच्या वाटचाली बाबत माहिती यावेळी मांडली. सूत्रसंचालन शेखर पाटील व आर बी महाजन यांनी केले.

पूरग्रस्तांसाठी मदत
कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना सावरण्यासाठी जगातून मदत होत असतांना, या कार्याला हातभार लावण्यासाठी रावेर तालुका मराठा समजाच्या वतीने मराठा विकास मंडळाने 51 हजार रुपयांची मदत खा.संभाजी भोसले यांच्याकडे सुपूर्द केली.

मराठा समाजाचे सरपंच मंडळाच्या मदतीला
रावेर तालुका मराठा समाज मंडळाला तालुक्यातील सरपंचानी 41 हजार रुपयांची मदत केली.यात नेहता सरपंच महेंद्र पाटील,अजंदा सरपंच रेखा पाटील,दोधा वंदना पाटील,गहुखेडा जगदीश पाटील,तासखेडा विजया चौधरी,धुरखेडा विश्र्वनाथ पाटील,निंभोरा दिगंबर चौधरी,अटवाडे गणेश महाजन,कळमोदा सारिका पाटील,खिरवड नीलकंठ चौधरी,धामोडी योगेश पाटील,सावखेडा लता पाटील,भाटखेडा कैलास पाटील,सिंगत प्रमोद चौधरी,विवरा कविता पाटील यांनी मराठा मंडळाला 41 हजार रुपये देणगी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!