Friday, April 26, 2024
Homeजळगावआज रथोत्सव, जागेवरच पूजा

आज रथोत्सव, जागेवरच पूजा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहराचे आराध्य दैवत असलेले श्रीराम मंदिराचा रथोत्सवाची प्रातिनिधीक स्वरुपात गुरूवार 26 रोजी सकाळी 11 वा. रथ चौकातच हभप मंगेश महाराज यांच्या हस्ते पार पडणार आहेे.

- Advertisement -

करोनाच्या सावटामुळे तसेच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता असल्यामुळे यावर्षी रथोत्सवास परवानगी मिळाली नसून रथोत्सवाची केवळ जागच्या जागी पूजा होणार आहे .

या ठिकाणी पोलिस प्रशासन व मनपाने नुकतीच भेट दिली व रथ शहरात फिरणार नसल्याचा निर्णय घेतला.

यावेळी मंदिर ट्रस्टी, मनपा व पोलिस प्रशासनात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राउत, पोलिस अधीक्षक मुंडेंसह मनपाचे प्रभाग समिती अधिकारी तसेच मंदिर ट्रस्टी उपस्थित होते.

150 वर्षाची परंपरा खंडित

तब्बल 150 वर्षाची परंपरा असलेल्या रथोत्सवाची परंपरा खंडित होवू नये. यासाठी पुष्कळ प्रयत्न केले गेले मात्र कोरोनाचे सावट पाहता केवळ जागेवरच 10 पावले रथ ओढून घेण्याचे मनपा व प्रशासनाने ठरविले.

जिल्ह्याभराचे दैवत असलेला हा रथोत्सव आहे. दुरदूरुन या रथोत्सवाच्या पाहण्यासाठी नागरिक येतात. यावेळी कोरोनाच्या वातावरणामुळे सर्वच सण महोत्सवाला बंदी आलेली आहे. मात्र परंपरा खंडित होवू नये हा उद्देश होता. रथोत्सव पहायला मिळणार नसल्याने समस्त शहरवासीयांची घोर निराशा झाली आहे.

प्रातिनिधीक स्वरुपात पूजन

लॉकडाउन तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जिल्ह्यातील रथोत्सवाच्या आनंदापासून नागरिकांना मुकावे लागले आहे. अमळनेर, पिंप्राळा,धरणगाव, चोपडा, पारोळा येथील रथोत्सवाच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्यात आला. या सर्व ठिकाणी फक्त 10 पावले रथओढण्यात आला. याच पार्श्वभूमीवर शहरातील रथोत्सवही प्रातिनिधीक स्वरुपात साजरा करण्याचे ठरले. आरोग्य विषयक सर्व नियम पाळूनच रथोत्सव साजरा होणार आहे.

भाविकाना आवाहन आह की रथ दर्शनासाठी गर्दी करु नये, फेसबुक माध्यमाद्वारे घरीच दर्शन घ्यावे, श्रीराम रक्षा स्तोत्र घरोघरी पठण करावे, मास्क किंवा रुमाल वापरावा, सुरक्षित अंतर ठेवा, स्वत:सह इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन राम मंदिर संस्थानचे ह.भ.प. मंगेश महाराज, समिती अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, विश्वस्त भरतदादा अमळकर, अ‍ॅड. सुशील अत्रे, दादा नेवे, शिवाजी भोईटे यांनी केले आहे.

सोंगाडेही निघणार नाहीत

रथाच्या वेळी मिरवणुकीत नाचणारे भवानी(सोंगाडे) हेही निघणार नसल्याने यावेळी रथोत्सवाच्या आनंदाबरोबरच सोंगाडे यांची कला, नृत्य पाहण्याच्या आनंदावरही वीरजण पडणार आहे. या भवानींचेही त्या त्या ठिकाणी जागेवरच पूजन होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या