Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

महिला अत्याचाराविरोधात छत्रपतींच्या शासनपद्धतीवर सजीव आरास

Share
जळगाव । रथ चौकात असलेल्या जिद्दी मित्र मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून सजिव आरास साकरली जात आहे. यंदा मंडळाने सजीव आरास साकारण्यात आली आहे. यामध्ये मुघलांकडून महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांची शासन पद्धती यावर सजीव आरास साकारण्यात येणार आहे.

शहरातील जूने जळगाव परिसरात असलेल्या रथचौकात सन 1980 साली जिद्दी मित्र मंड

ळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाकडून दरवर्षी समाजातील ज्वलंत विषय व सामाजिक संदेश देण्याविषयी सजीव आरास साकारण्यात येत असते. यावर्षी देखील मंडळाकडून शिवकालीन राज्यपद्धतीवर आरास साकारण्यात येणार आहे. सध्याच्या काळात महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हवी. या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन पद्धतीची सजीव आरास साकारण्यात येणार आहे. या आरासमध्ये 10 कार्यकर्त्यांकडून गणेशोत्सवात दररोज आरास साकारली जाणार आहे. तसेच मंडळातर्फे यंदा 6 फुटांची गणेशाची आकर्षक अशी मुर्तीची देखील स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष मुनेश बारी यांनी दिली.

सजीव आरास साकारण्यावर भर
गेल्या 38 वर्षांपासून रथचौकात जिद्दी मित्र मंडळ गणेशोत्स मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करीत असतो. मंडळास्थापनेपासून मंडळाकडून दरवर्षी विविध सजीव आरास साकरण्यात आले आहे. यामध्ये भिष्मपितामह, शेतकरी आत्महत्या, सीताहरण, श्रावणबाळ, एकलव्य, ठेवीदारांच्या अडचणी, वाल्याकोळी, अहिल्या उद्धार यासह विविध ज्वलंत व ऐतिहासिक विषयांवर आरास साकारण्यावर मंडळाचा भर असतो.

ही आहे मंडळाची कार्यकारिणी
मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीष वाणी, उपाध्यक्षपदी योगेश वाणी, कार्याध्यक्षपदी मुनेश बारी, सचिव राकेश बारी तर सदस्य म्हणून जगदीश निकम, शरद चव्हाण, सचिन परदेशी यांच्यासह असंख्य कार्यकते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!