Type to search

maharashtra जळगाव राजकीय

रामेश्वर कॉलनीत पैसे वाटतांना युवकाला पकडले

Share
जळगाव । शहरातील रामेश्वर कॉलनीत पैसे वाटतांना सायंकाळी 5.45 वाजेच्या सुमारास एका जामनेरच्या युवकाला काही कार्यकर्त्यांनी पकडून एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकारामुळे परिसरात काहीवेळ गोंधळ होवून तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, याबाबत या युवकाची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्राजवळ 100 रुपये प्रमाणे जितेंद्र वामनराव दलाल वय 43 रा. जामनेर या युवक पैसे वाटत असतांना काही नागरिकांनी पकडले. त्यानंतर तो शिवसेनेचे नगरसेवक व माजी नगरसेवकाच्या भावाने या युवकाला गर्दी सोडवून कार्यालयात नेले. त्यानंतर त्याला सोडून दिले. दरम्यान जितेंद्र दलाल हे या.दे.पाटील शाळेजवळून जात असतांना सामाजिक कार्यकर्ते भुषण सोनवणे, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष ललीत बागुल यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडू पैसे देखील आढळून आले.

याप्रकारामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. यावेळी पैसे वाटणार्‍या युवकाने भाजपचा कार्यकर्ता असून मंत्री यांना फोन लावत असल्याचे सांगितले होते. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे यांच्यासह सफौ. अतुल वंजारी, मनोज सुरवाडे, सिध्दार्थ लटपटे यांनी याठिकाणी धाव घेवून पैसे वाटणार्‍या जितेंद्र दलाल या युवकाला ताब्यात घेतले. त्यानंतर या युवकाला एमाआयडीसी पोलीस स्टेशनला नेण्यात आले. याठिकाणी राष्ट्रवादी व भाजपच्या पदाधिकार्‍यांनी गर्दी केली. जितेंद्र दलाल हे जामनेर येथील एका संस्थेत लिपीक म्हणून कार्यरत आहे. दलाल यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!