समीक्षण : ‘जीत’ कोणाची ?

0

कथासूत्र आणि नाटक या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी लेखनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशिल असतात. कथेतली संवेदना नाटकात रुपांतरीत करायची झाल्यास त्याची ‘परिमाणं’ बदलतात, संवाद हे प्रमुख माध्यम ठरत, अजून एक अत्यंत महत्त्वपूर्ण ‘बाब’ म्हणजे ‘प्रसंग’ याचा प्रवाहीपणा आणि वेग, हा वेग म्हणजे गती नव्हे तर ‘नाट्य’ हे नाट्य एकसंघ हा वेग ठेवतो आणि नेमका हा वेगच कुठेतरी दवडला.

अनिल कोष्टी रुपांतरीत ‘आलोक’ या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कथा संग्रहातील ‘जीत’ या कथेची ‘रंगावृत्ती’ विषय पठडीतला राजकारण आणि राजकारण म्हटलं की, स्पर्धा, लालसा, कुरघोडी, संधीसाधू वृत्ती या आपसूक येतातच.

राजकारण हे चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांच नसतंय. एकमेकांना शह काटशह देत फक्त आपला ‘उल्लू’ कसा सिधा करता येईल. या करीता कुठल्याही थरा पर्यंत जायची तयारी ई. दोन गटातील हा जीवघेणा खेळ एकाच खरच ‘जीव’ घेऊन सुरु होतो. सरपंच व सभापती निवडणूकीमध्ये या ‘जीवा’चाही वापर करुन घेतात.

जो संपतो त्याच्याच पत्नीला निवडणूक लढण्यास तयार केले जाते. आणि शेवटी तिची होणारी घालमेल मुळाची ओढाताण, हे सर्व ओघाने झालंच, परंतु हा प्रवास नाट्य निर्माण न करताच ‘जीत’ होते.

‘शो मस्ट गो ऑन’

जित या नाटकातील कलावंत रवि सुपेकर हे काल दि.6 रोजी खाजगी कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. तेथुन येतांना त्यांच्या एस.टी.बसचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी होवून त्यांना डोक्याला, पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे रवि सुपेकर आजच्या नाटकात काम करु शकणार नाही. अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र हरहुन्नरी कलावंत असलेल्या सुपेकर यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर कलेची उपासना जोपासत नाटय प्रयोगात कला सादर करून सर्वांना सुखद धक्का दिला. अशा या कलावंताचे सर्वांनीच कौतुक केले. म्हणून म्हणावेसे वाटते की शो मस्ट गो ऑन…!

इथेच दिग्दर्शक अनिल गोष्टी काहीसे कमी पडलेले दिसतात. त्यांची या माध्यमावरची हुकूमत वाखणण्याजोगीच आहे. परंतु या कथेच रुपांतरण करतांना नाटकाच्या गतीचा ‘र्‍हास’ होत नाही ना हे पहाणे अतिशय गरजेचे होते, प्रसंगातूनच नाट्य पुढे सरकत असते. व नाटकाची एक लय पकडून ‘परिणाम कळसाध्याय’ साधायचा असतो, अपेक्षित लय ही दिग्दर्शनाच्या माध्यमातूनच शोधायची आहे, संहितेमधील गाण्यांचा वापर अजून कल्पकतेने होणे आवश्यक…

गल्लीतल्या गल्लीत यात्रा प्रभावी ठरले. त्या प्रसंगामधील प्रकाश योजना व काही प्रसंग साईकच्या माध्यमातून प्रभावीरित्या खुलवण्यात यशस्वी. प्रमुख्याने अपघात होतांना, निवडणूकीचे फॉर्म भरतांना पंढरी व कौसाबाई यांचे प्रसंगी त्यांची होणारी घुसमट, नवर्‍याचे नुकताच निधन झालेले असतांना निवडणूक लढवणे तिच्या जिवावर आलेले असते, मुलाची होणारी घुसमट त्याच प्रमाणे विरोधी पार्टीचा पंढरी तर वारकरी पंथाचा पंरतु राजकारणाच्या या विदारक बाजूचे दर्शन झाल्यावर हादरतोच ! परंतु या सर्व परिस्थितीचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी न करुन घेतील तर ते राजकारणी कसले?

नाट्य समीक्षक – सुबोध सराफ

ते या दोघांना बरोबर आपल्या जाळ्यात ओढतात, सरपंच आणि सभापतीच्या ओढाताणीत ‘जीत’ ही शेवटी कौसाबाईची लौकिकार्थाने होते. तिला ही ‘जीत’ वाटते आहे का?

सभापतीच्या भूमिकेत अनिल कोष्टी यांचा रंगमंचावरील वावर अतिशय सहज असाच होता, संपूर्ण रंगमंचावरील हलचाली या वेधक अशाच होत्या, सरपंच झालेले श्रीकांत कुळकर्णी यांची एनर्जी वाखाणण्यासारखीच.

काही प्रसंगांमध्ये आबा चमकतात. कुंदन तावडे याने मात्र थोडी निराश केली त्यांच्या गायनात अजून तडफ हवी होती, दिग्दर्शन आणि लेखक या दोन्ही जबाबदार्‍या खूप महत्त्वाच्या ठरतात.

आज पुन:श्च अनिल कोष्टी यांच्यातील दिग्दर्शक काहीसे कमी पडतात. नाटकाची लय अजून वरच्या पहीतली असती तर अपेक्षित परिणाम साधणे सहज शक्य होते.

या नाटकातील वाद्यवृंद, गायक, प्रकाशयोजना या प्रसंगानुरुप, वेगवेगळ्या स्तरावर भूमिकाही योग्य वठवल्या गेल्यात परंतु या सर्व माध्यमांचा एकसंघ परणिाम कुठेतरी हरवतो आणि ‘जीत’ कोणाची हा प्रश्न पडतो.

 

 

 

LEAVE A REPLY

*