समीक्षण : थांबा… रामराज्य येतय… व्यवस्थेचा दशावतार

0

धार्मीक तेढ हा आपल्या देशाच्या राजकारणाचा अविभाज्य घटक आहे? सध्याचे राजकारण, समाजकारण याचे संदर्भ अगदी पुराणकालीन कथांमध्ये देखील मिळतात, किंवा त्याचीच पुरनावृत्ती फक्त आज घडत आहे.

लेखक प्रकाश त्रिभुवन यांनी थांबा… राजराज्य येतय या नाटकाद्वारे दलित, पाटील हा संघर्ष दाखवतांना या प्रसंगांची बेमालूमपणे गुंफन केलेली आढळते.

दशावतारी खेळ करणारे यांचाही वापर गावातील राजकारणासाठी कशा प्रकारे करता येईल. गावाचे पाटील मोठ्या इरसालपणे दाखवतात.

हनुमानाच्या शेपटीला लागलेली आग ही दलितांची वस्ती भस्मसात करेल, आणि गावकरी व पाटील परंपरा कशी राखली जाते याच अविर्भावात असतात.

पोलिस पंचनामा करतात आणि नेहमीप्रमाणे निकाल जो लागायचा तसाच गावाचा पाटील लावून घेतो. उच्चशिक्षण घेवून गावाकडेच परतलेला आनंद हा दलित असतो.

त्यांचा महोरक्या बनून त्यांना पाटीलच्या जोखडातून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतू तस करतांना त्याचा वैयक्तीक पाटलाला विरोध नाही. तर त्याच्या वृत्तीला आहे.

हे तो त्याच्या आईला व लहान भावाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा ते गांव सोडून जातात. परंतू आनंद गावातच राहण्याचा निर्णय घेतो. या मागे कारण असे असते की, पाटील त्याला सरपंच पदाचे अमिष दाखवतो.

या संघर्षाचे सादरीरकण करतांना पौराणिक संदर्भ वापरण्यात आले आहे. मी समुद्र मंथनातून जेव्हा काही प्रश्न निर्माण होतात. दानवांना झुकुन माप देण्याची वेळ येते तेव्हा ब्रम्हदेव शिकवण देतात.

कि प्रसंगी दानवांना आपल्या बरोबरीने वागवा व कठिण प्रसंग संपला की त्यांना दूर करा. म्हणजे सापाप्रमाणे वागा त्याचप्रमाणे गावाचा पाटील कुटील कारस्थान करतो.

पाटील यांची भूमीका पार पाडणारे विशाल महाले यांनी त्यांच्या लोककलेचा वापर मुक्तपणे केलेला आढळतो. त्यांची देहबोली या इरसाल पाटीलला शोभेसी अशी चा या भूमीकेतील बारकावे दाखतांना विविध हालचाली वेधक ठरल्यात.

परंतू संवादकलेवर थोडीशी मेहनत घ्यायला हवी हाती. त्यामुळे अधिक उठावदार पाटील झाला असता. राम राज्य येतय हे फक्त गावा पुरतच मार्यादित राहत… गावातील राजकारण आणि सामाजिक संदर्भ घेतांना दलितांना संघर्ष आणि पाटील असेच मर्यादित स्वरुप राहते.

रामराज्य येणार या आशेवर दलित बांधवांची होणारी पिळवणूक आणि गावाचा पाटील त्याची दहशत वेगवेगळ्या कारस्थानांमधून दाखवत, अत्याचार अधिकच धारदार करत जातो.

गावातील माहिती गोळा करणार्‍यांवरच कशाप्रकारे अत्याचार करतो. कोणी काही बोललं नाही कोणी काही पाहिलं नाही आणि कोणी काही ऐकलं नाही. गांधीजींची तीन माकडांचे प्रतिक वापरतांना पाटील अत्याचाराचे स्वरुप उघड होत जाते.

सरपंच झालेला आनंद जेव्हा पाटलाच्या विरोधात निर्णय घ्यायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र पाटलाचा तोल सुटतो. आणि आनंदला भर सभेत संपवतो.

अशा प्रकारे दडपशाहीने स्वत:चेे वर्चस्व पर्यायाने दलितांचे शोषण आणि स्वत: मात्र आपल्यालाच मस्तीत जगतांना पाटील दाखवला आहे.

हा शेवट जरी असला तरी दलित मात्र रामराज्याची वाट किती दिवस पाहणार बाबासाहेबांनी दिलेला संदेश म्हणजे शिक्षण घ्या आणि स्वत: चा उद्धार करा असेच मार्गदर्शन केले आहे.

परंतू समाज विघातक प्रवृत्ती आनंद सारख्या तरुणांना चिरडून टाकले व रामराज्य येतय हा केवळ पोकळ आशावादच राहतो. आनंदची भूमिका आणि लेखन या दोन्ही जबाबदार्‍या मार्टिन खैरनार चांगल्या रितीने पार पडतात.

प्रसंगांची गुंफण ही अजून सफाईदार पणे झाले असती. तर नाटक अधिकच रंगतदार झाले असते. दशावतराप्रमाणे सर्व नवोदित कलाकारांचे विशेष कौतूक.

 

LEAVE A REPLY

*