राज्यनाट्य स्पर्धा – समीक्षण : ‘ए’ मायनस ‘अ’… लई डेन्जर

0

महात्मा गांधी पुढच्या वेळेस आता असही म्हणतील की मी आता नाटकातूनच दिसतो. बहुतेक ही अपरिहार्यता असावी की काय अशाच प्रकारे गांधींना हे जवळपास प्रत्येक नाट्यातून अवतीर्ण होत आहेत.

अर्थात आजचे नाटक ‘ए’ मायनस ‘अ’ सामाजिक संदर्भ घेतांना खूप विविध स्तरांवर कधी मनोरंजन तर कधी मार्गदर्शन तर कधी उपदेश करत हा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचवतात.

‘इंग्लिश‘ बोलता येणं ही गरज आहे. हे आतापर्यंत बहुतेकांना समजल आहेतच. परंतु याचा बाऊ न करता किंवा न्युनगंड न बाळगता आत्मविश्वासाने जर शिक्षण हे कुठल्याही भाषेत घेतले तर जगण्यासाठी आवश्यक जे आहे ते मिळवता येईल.

‘शिक्षण’ हे कुठल्याही भाषेत घ्याव आणि ते माणूस घडवणार आहे का? याचाही विचार करणे आवश्यक आहे. लेखक किरण अडकमोल हे विविध प्रसंगातून हा ज्वलंत विषय मोठ्या खुबीने मांडतात.

आजच्या या जीवघेण्या स्पर्धेत मुलांवर आपण दडपण तर आणत नाही ना? याचाही विचार करणे खूप गरजेचे आहे. खूप प्रसंग एकामागून एक आदळत राहतात. अर्थात या सर्व तरुणाईची एनर्जी आहे.

सर्व मुली खूप जोशात हा प्रयोग करतात. परंतु काही ठिकाणी आवाजाची पट्टी अकारण वरती जातांना दिसते. दिग्दर्शकाने या उत्स्फूर्त एनर्जीचा वापर अजून थोड्या कल्पकतेने करायला हवा असे वाटते.

अर्थात नाटकाच्या मूळ गाभ्यावर याचा विशेष परिणाण होत नाही याचे कारण या संहितेचा वेग… खूप प्रसंग एकामागून एक घडत जातात.

मग यामध्ये शाळेच्या अ‍ॅडमिशन पासून ते पालकांच्या दिखाऊपणा, त्यांची प्रतिष्ठा सतत मुलाच्या मागे लागून त्याने सर्वच ठिकाणी परमॉर्मन्स हा द्यायलाच हवा.

याचा अतिरेक मुलाची इच्छा नसतांनाही त्याला यंत्रवत राबवून घेणे आणि याचे पर्यावसान शेवटी मानसिक दडपण सहन न झाल्यामुळे तो आत्महत्येचा मार्ग स्विकारतो.

ही भीषण वास्तवता मात्र सर्व कलाकरांनी अतिशय संवेदनशीलतेने सादर केली. वर्गातील प्रसंग सुरुवातीचे खेळ यामध्ये समन्वय साधला जात होता.

सुबोध सराफ – नाट्य समीक्षक

सुरवातीचा इंग्लिश भाषेचा विषय विविध पातळ्यांवरून प्रवास करतांना थोडासा सुटल्यासारखा वाटत होता. आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करण्यासाठी पारंपारिक व्यवसाय करतांना कुठे इंग्लिश भाषेची आवश्यकता भासते? एवढच काय पण प्रेम मिळवण्यासाठी देखील प्रियकरास इंग्लिश भाषा येणे किती गरजेच आहे. हे एका प्रसंगातून दिसत.

इंग्लिश न बोलता येणे आणि त्याची हेटाळणी करुन तो कसा योग्य नाही हे मस्करीच्या स्वरुपात दाखवले जाते. आई-बाप मुलाला मोठ्या कष्टाने शिकवतात.

विदेशात पाठवतात परंतु मुलगा आरोप करतो की तुम्ही तुमच्या शोकांसाठी, मौजमजेसाठी कर्ज काढल. माझ्या शिक्षणासाठी नाही.

हा प्रवास खूप प्रसंगांमधून समुहनाट्यामधून मांडतांना दिग्दर्शक म्हणून किरण अडकमोल यांनी आपले कसब पणाला लावले आहे. परंतु हे प्रसंग खूप एका मागे एक येत राहतात.

सर्वांचा एकत्रित परिणाम साधण्यासाठी मात्र महात्मा गांधींची एन्ट्री होते आणि नाटक संदेशात्मक पातळीवर जाते. हा एक यशस्वी फॉर्म्युला सातत्याने वापरण्यात येत आहे. रंगमंचावरील समुहाच्या हालचाली, त्यांची कंम्पोझिशन्स मात्र वेधक अशाच होत्या.

या सर्वांमध्ये विशेष लक्षात राहतात सपना बाविस्कर, आरती गोळीवाले, पुनम जावरे सर्वांची काम करण्याची तडफ मात्र उल्लेखनीय. शेवट परिणामकारक आणि प्रबोधनात्मक ठरतो.

 

 

LEAVE A REPLY

*