समीक्षण : ‘उंच माझा झोका’ पारंपारिक दुरावस्थेवर परखड भाष्य

0

पूर्वापार काळापासून चालत आलेली दांभिकतेवर आधारीत आणि कायम स्त्रीला दुय्यम भूमिका देणारी कुमकुवत समाजरचना, खर तर हा विषय ज्वलंत आणि दुहेरी मापदंडावर जोखली जाते ती स्त्रीच, लेखक शेलेश गोजमगुंडे यांनी अतिशय संवेदनशील अशा विषयाला नााटकाचा बाज दिला या करिता विशेष अभिनंदन.

समाजामध्ये पुरुष आणि स्त्रीया समानतेचा दर्जा मिळणार आहे का? वेगवेगळया पातळ्यांवर अनेक वेळा केवळ स्त्री च या विषमतेची बळी ठरलेली दिसते, या विषयाचा आवाका तसा पाहिला तर खुप व्यापक असाच आहे, विषय निवडतांना आणि त्याचे नाट्यीय रुपांतरीत करतांना ते भडक तर होत नाही ना ? प्रसंग परिणामकारक करण्यासाठी मांडणी ही अगदीच ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट तर होत नाहीये ना ? यामध्ये ग्रेशेड सुध्दा असावी.

संपूर्ण नाटक हे या झोक्यावर हेलाकावे घेत होते. दिग्दर्शकाने मात्र या अतिशय संवेदनशील विषयाची मांडणी मात्र एका विशिष्ट उंचीवर नक्कीच नेली आहे.

दोन्ही मैत्रिणींचे सुरवातीपासूनचे प्रसंग आणि वर्तमानातून भूतकाळाकडे नेण्याची हतोटी विशेष उल्लेखनीय, दोन मैत्रिणींचा हा प्रवास लहानश्या गावामधून सुरु होतो. भिन्न स्वभावाच्या, प्रवृत्तीच्या या दोन्ही आपआपली जीवन पध्दती स्वीकारतांना मात्र वाट्याला येते ते विदारक, जीवघेण आयुष्य, लहानपणी आयुष्याबद्दल रंगवले ती स्वप्न, मोठेपणी त्याला तसे स्वरुप प्राप्त होईलच याची खात्री देता येत नाही.

दोघींचेही नवरे त्यांच्या कठीण काळात कच खातात आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याच्या वाताहतीला सुरवात होते. मधू गाव सोडून शहराकडे जाते तिथे ती पुरुषी अत्याचाराला बळी पडते.

जो नवरा प्रत्येक क्षणी साथ देईल असा विश्वास तिला वाटत असतो तोच पोलिस केस करण्यास नकार देतो व तिला वार्‍यावर सोडून देतो.

इकडे गावात मधुचेही काही वेगळे घडत नाही. पितसमान सासराच तिचा भोग घेतो. नवरा मात्र मूग गिळून गप्प राहतो. सामाजिक दुभंगलेपणावर आणि दुहेरी मापदंडावर नेमकेपणाने बोट ठेवण्यात आले आहे.

लेखकाने प्रसंगाची मांडणी आणि राजस्थानी लमाणींचा उपयोग देखील साजेसा असाच केला आहे. त्यांची वेशभूषा मात्र सुसंगत असायला हवी होती, असे वाटते.

सुमी आणि मधु या दोन्ही मध्यवर्ती पात्रांवर आधारीत नाट्य विविध वळणे घेत दिग्दर्शक समाजाच्या दांभिकपणावर कोरडे ओढतो. सुमीच्या भूमिकेत अमृता भोवे यांनी रंगत आणली.

काव्याचा, कवितेचा मुक्त वापर संवादांमध्ये करण्यात आला होता आणि कविता म्हणतांना आणि संवद बोलतांना आवाजामध्ये थोडा बदल आवश्यक होता.

परंतु त्यांचा रंगमंचावरील वावर मात्र सहज आणि विश्वसनीय होता. मधू झालेल्या अश्विनी कोल्हेने देखिल भूमिकेत रंगत आणली. तिची संवाद फेक उजवी ठरते.

विशिष्ट प्रसंगामध्ये तिचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा, आवाजाचा पोतही त्या भूमिकेला न्याय देणारा आणि दोघींचे एकत्र प्रसंग, लहानपणीच भावविश्वात रंगून जाणे, जीवनाबद्दलचा अपेक्षा आणि वाट्याला आलेले विदारक भीषण सत्य हे दोघींनी उत्तम दर्शविले.

दिग्दर्शक म्हणून विशाल जाधव निश्चितच यशस्वी. संपूर्ण नाट्ययात विषयाची मांडणी आणि प्रवाह हा झोक्याप्रमाणेच उंच नेण्यात बाजी मारली.

पुजारी आणि सासर्‍याच्या भूमिकेत गणेश सोनार प्रभावी, त्यांची देहबोली आणि आवाज भूमिकेला न्याय देणारा असाच. मधुकर आणि आबा यात आबा थोडा भाव खाणारा सादर केला.

दीपक पाटील यांनी लमाणींचे नृत्य आणि कथेतील तयंचे महत्व उल्लेखनीय, प्रकाश योजना प्रसंगोचित आणि परिणामकारक, वेशभूषेवर थोडी मेहनत घ्यायला हवी होती.

सुमीच्या आणि मधुच्या वेशभूषेत विविधता दाखवता आली असती. लेखक आणि दिग्दर्शक ही दोघे नाटक परिणाणकारक करु शकतात. हे ‘उंच माझा झोका’च्या प्रयोगाने सिध्द केले.

 

LEAVE A REPLY

*