Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव फिचर्स मुख्य बातम्या

राज्य नाट्य स्पर्धा : 15 नोव्हेंबरला स्पर्धेचा बिगुल वाजणार

Share

हौशी रंगकर्मींसाठी महाराष्ट्र शासनाची 58 वर्षांची परंपरा असलेली स्पर्धा

जळगाव –

राज्यातील 19 केंद्रावर हौशी रंगकर्मींसाठी आयोजित होणारी राज्य नाट्य स्पर्धा आजही आपले वलय टिकवून आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे आयोजित होणार्‍या 59 व्या राज्य नाट्य स्पर्धेची जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात दि.15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय मराठी रंगभूमी समृध्द करण्याकरिता या स्पर्धांचे आयोजन करीत असते. स्पर्धेची गौरवसंपन्न अशी 58 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजवरच्या स्पर्धांतून नवनवीन प्रयोग करून मराठी रंगभूमीस समृध्द करुन वैश्‍विक स्तरावर नेणारे अनेक नाटककार, अभिनेते, तंत्रज्ञ व दिग्दर्शक मराठी रंगभूमीला लाभले आहे.

मराठी रंगभूमी अजून सृजनशील, क्रियाशील व तेजस्वी करण्यासाठी राज्यभरातील 19 केंद्रावर या स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात येते.

यंदा जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी दि.15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान शहरातील छत्रपती  संभाजीराजे नाट्यगृहात सायं. 7 वाजता होणार आहेत.

जळगाव केंद्रावर 21 दिवस स्पर्धा –

जळगाव केंद्रावर 21 दिवस ही स्पर्धा सुरु राहणार असून, 15 नोव्हेंबर रोजी उत्कर्ष कलाविष्कार भुसावळतर्फे राहुल बनसोडे लिखीत, अनिल कोष्टी दिग्दर्शित आर्टिफिशिअल इंजेलिजन्स, 16 नोव्हेंबरला सुबोध बहु. युवा प्रतिष्ठान जळगावतर्फे रुपाली गुंगे लिखीत राज गुंगे दिग्दर्शित जतरा, दि.17 नोव्हेंबर रोजी लोकमंगल कलाविष्कार सह.संस्था धुळेतर्फे निळकंठ महाजन लिखीत, सुजय भालेराव दिग्दर्शित उजेड विकणारी बाई, दि.18 नोव्हेंबरला मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदौर यांचे अमोल रेडीज लिखीत, पंकज वागळे दिग्दर्शित जिहाद, दि.19 नोव्हेंबर रोजी नाट्यभारती इंदौर यांचे ऋषिकेश वैद्य लिखीत, अमोल दामले अनुवादीत श्रीराम जोग दिग्दर्शित मॉर्फोसिस, दि.20 नोव्हेंबर भारतीय साहित्य सांस्कृतिक कला विकास मंच भुसावळ यांचे वैभव भंडारी लिखीत, संजय तारांबळे दिग्दर्शित पंचम, दि.21 नोव्हेंबरला नूतन मराठा महाविद्यालयाचे हनुमान सुरवसे लिखीत दिग्दर्शित बुजगावन, दि.22 नोव्हेंबरला समर्थ बहु. संस्था जवखेडे यांचे विठ्ठल सावंत लिखीत, विशाल जाधव दिग्दर्शित अर्जुन की अभिमन्यू, दि.23 नोव्हेंबर रोजी जय गणेश फाऊंडेशन भुसावळ तर्फे विरेंद्र पाटील लिखीत दिग्दर्शित झेंडूचं फुल, दि.24 नोव्हेंबर जननायक थिएटर ग्रुप जळगावतर्फे सोनल चौधरी लिखीत दिग्दर्शित 2048, दि.25 नोव्हेंबर रोजी केअर टेकर फाऊंडेशन जळगाव यांचे रमेश भोळे लिखीत दिग्दर्शित विश्‍वासघात, दि.26 नोव्हेंबरला फ्लाईंग बर्ड फाऊंडेशन जळगाव यांचे आनंद प्रभू लिखीत, किरणकुमार अडकमोल दिग्दर्शित लग्न नको पण पप्पा आवर, दि.27 नोव्हेंबर रोजी डॉ.अ.जी.जी.बेंडाळे महाविद्यालय, जळगाव यांचे रुपाली गुंगे लिखीत, अश्‍विनी भालकर दिग्दर्शित शकुंतला एक विरह, दि.28 नोव्हेंबर रोजी कलवोब मल्टीपर्पज फाऊंडेशन यांचे सुरेश राघव लिखीत, आकाश बाविस्कर लिखीत मानसन्मान, दि.29 नोव्हेंबर रोजी इंदाई फाऊंडेशन, बदरखे, ता.पाचोरा यांचे शफाअत खान लिखीत, रमेश लिला दिग्दर्शित पोलीसनामा, दि.30 नोव्हेंबर रोजी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र यांचे चंद्रकांत सपकाळे लिखीत, राजेश पवार दिग्दर्शित नव्या सूर्याची पहाट, दि.1 डिसेंबर रोजी मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांचे श्रीपाद देशपांडे, हेमंत पाटील दिग्दर्शित इस्टमन कलर, दि.2 डिसेंबर रोजी अविरत इंदौर यांचे अभिनय देशमुख लिखीत दिग्दर्शित मोस्ट वॉन्टेड मिलिंद, दि. 3 डिसेंबर रोजी  अष्टरंग इंदौर यांचे प्रशांत दळवी लिखीत, अनिल चापेकर दिग्दर्शित ध्यानीमनी, दि.4 डिसेंबर रोजी अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, जळगाव यांचे वैभव मावळे लिखीत दिग्दर्शित कोण नथुराम? मी गोखले विचारतोय तर स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दि.5 डिसेंबर रोजी आप्पासाहेब विश्‍वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव शरद भालेराव लिखीत, चिंतामण पाटील दिग्दर्शित हल्लाबोल ही नाटके सादर होणार आहेत.

नाट्यरसिकांनी नाट्यपर्वणीचा लाभ

शासकीय स्पर्धा असल्याने, तिकीट दर दि.15 व दि.10 रुपये असून, जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी या नाट्यपर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्यचे सचिव बिभीषण चवरे व जळगाव येथील राज्य नाट्य समन्वयिका सरिता खाचणे यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!