शिष्यवृत्ती योजनेपासून लाभार्थी वंचित रहायला नको! – ना.बडोले

0
जळगाव । दि.6 । प्रतिनिधी-सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणार्‍या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना मिळावा यासाठी अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. कुणीही लाभार्थी या शिष्यवृत्ती योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकार्‍यांनी घ्यावी, अशा सुचना राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री ना. राजकुमार बडोले यांनी दिल्या.
एम. जे. महाविद्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा ना. बडोले यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे, नाशिक प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, नाशिक विभागातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जात पडताळणी, नंदुरबारचे उपायुक्त माधव वाघ, अहमदनगरचे संजय दाणे, जळगावचे श्रीमती वैशाली हिंगे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ना. बडोले म्हणाले की, विभागात महाविद्यालयीन स्तरावर, जिल्हास्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहता कामा नये.

महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. मुलींच्या वसतीगृहासाठी प्रस्ताव पाठवावे. सैन्य व पोलीस भरती प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त मुलांना पाठवावे.

ज्या मुलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले त्यापैकी किती मुलांना नोकरी मिळाली याचा आढावा घेण्याच्या सुचना देखील यावेळी ना. बडोले यांनी दिल्या.

बंद असलेल्या औद्योगिक सहकारी संस्था रद्द करणेबाबतचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. मुलींच्या वसतीगृहात महिला वार्डन असावे.

वसतीगृहात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबधीत अधिकार्‍यांनी काळजी घ्यावी. संबंधीत अधिकार्‍यांनी वसतीगृहास प्रत्यक्ष भेट देवून तेथील अडीअडचणी सोडवाव्यात, अशाही सुचना त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्यात.

यावेळी नाशिक प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल यांनी विविध योजनातंर्गत झालेल्या कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली

 

LEAVE A REPLY

*