‘अल निनो’चे संकट टळले – यंदा उत्तम पाऊस

0
नवी दिल्ली । दि.21 । वृत्तसंस्था-मान्सूनवर मोठा परिणाम घडवून आणणार्‍या ‘अल निनो’चा प्रभाव पूर्णपणे ओसरला असून देशातील सर्वाधिक पिक घेणार्‍या उत्तर भारतातील राज्यांमध्ये यंदा उत्तम पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
याबरोब महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असल्याचेही हवामान खात्याने जाहीर केले आहे.
मध्यप्रदेशातही पावसाची स्थिती उत्तम आहे. विशेषत: पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
यामुळे पेरणीसाठी योग्य ती स्थिती निर्माण झाली असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.

काही आठवड्यांपूर्वी पॅसिफिक महासागरातील काही भागांमध्ये ‘अल निनो’चा प्रभाव कायम राहणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

या कारणामुळे मान्सूनचा जोर ओसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. आता मात्र भारतीय आणि परदेशी हवामान विभागांनी सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे.

जगभरात मान्यता पावलेल्या ऑस्ट्रेलियातील हवामान विभागाने देखील मअल निनोफबाबत दिलेला अलर्ट मागे घेतला आहे.

‘अल निनो’चा नैऋत्य मोसमी वार्‍यावर होणारा परिणाम निष्प्रभ होणार असल्याचे भारतीय हवामान विभागानेही म्हटले आहे.

‘अल निनो’बाबतचा अंदाज आपण एप्रिल महिन्यातच व्यक्त केला असल्याचेही भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे

 

LEAVE A REPLY

*