Type to search

Featured

चोपडा : भिज पावसामुळे पिके वाया जाण्याची भीती

Share

वेले ता चोपडा (वार्ताहर):- येथे आणि परिसरात भिज पावसामुळे मूग, उडीद ,आदी. पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक केली जात असून सततचा भिज पावसामुळे धाब्याच्या घरांना गळती लागली आहे.त्यामुळे अशा घरात रहाणे ग्रामस्थांना धोक्याचा वाटू लागले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या आठ ते दहा दिवसापासून वेले आखतवाडे आणि परिसरात भिज पाऊस पडतो आहे. त्यामुळे कापूस पिकांची फवारणीची मात्रा दिली जात नसल्याने कापूस पिकावर मावा, तुडटुडे व किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे. तसेच सततच्या भिज पावसामुळे परिपक्व झालेले मुग, उड़ीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुग, उडीदांच्या शेँगामधून बाहेर कोंब पडवयास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे हाताशी आलेले मुगाचे पिक वाया जाण्याची भिती शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे. तसेच सततच्या भिज पावसामुळे शेतीची कामे खोलंबली असून मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मजुरांना हाताला काम नसल्याने मजुरांना आर्थिक चनचन भासत आहे.एकंदरीत सततचा भिज पाऊस नुकसानीचा ठरत आहे. तसेच सततच्या भिज पावसामुळे मातीच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. अशी घरे साततत्याने गळु लागली आहेत. तसेच मातीची घरे भिंतीमध्ये पाणी मुरल्याने भिंती पडून जीवितहानी मनुष्य हानी होण्याची शक्यता बळावली आहे.मातीच्या घरातील नागरिक जीव धोक्यात घालून याच घरामध्ये पर्यायी व्यवस्था नसल्याने राहत आहेत. सततच्या गळतीमुळे घरात ठिकठिकाणी गळके पाणी साठवण्यासाठी भांडी ठेवली जात आहे. एकंदरीत सततचा भिज पाऊस हा नुक्सानीचा ठरत असून शेतकरी उघडीप व्हावी अशी आशा बाळगुण आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!